आधी UPSC अवघ्या 2 गुणांनी हुकली, पुन्हा प्रयत्न करुन 2018 मध्ये बनला टॉपर; अक्षतच्या यशाची कहाणी देईल प्रेरणा

Akshat Jain IAS Story: आयएएस अक्षत जैनचे आई-वडिल सिव्हिल सर्व्हंट आहेत. त्यामुळे त्यांना लहानपणापासून लिखाण-वाचनाचे वातावरण मिळाले.

Pravin Dabholkar | Updated: Mar 4, 2024, 01:50 PM IST
आधी UPSC अवघ्या 2 गुणांनी हुकली, पुन्हा प्रयत्न करुन 2018 मध्ये बनला टॉपर; अक्षतच्या यशाची कहाणी देईल प्रेरणा title=
IAS Akshat Jain

Akshat Jain IAS Story: भारतामध्ये प्रत्येक वर्षी लाखो युवा आयएएस, आयपीएस अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहतात. पण याचील काहीजणच यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करुन स्वप्न पूर्ण करतात. यातील काहीजण एकदा नापास झाल्यास दुसऱ्या क्षेत्रात जातात. पण काही यूपीएससीवर अटल राहतात. आणखी प्रयत्न करतात. स्वत:वर मेहनत घेतात आणि यूपीएससी उत्तीर्ण करतात. आयएएस अक्षत जैन यांची कहाणी अशीच प्रेरणा देणारी आहे. याबद्दल जाणून घेऊया. आयएएस अक्षत जैनचे आई-वडिल सिव्हिल सर्व्हंट आहेत. त्यामुळे त्यांना लहानपणापासून लिखाण-वाचनाचे वातावरण मिळाले.पण नकळत एक दडपणदेखील होते. पण ते  आयएएस अधिकारी बनले आणि त्यांनी सर्वांच्या इच्छा पूर्ण केल्या.

आई-वडिलांकडून मिळाली प्रेरणा

यूपीएससी परीक्षा केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. यामध्ये यशस्वी झाल्याल देशातील सर्वोच्च पदाची सरकारी नोकरी मिळू शकते. यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केलेले उमेदवार आयएएस, आयपीएस, आयआरएस,रेल्वे अशा विभागांमध्ये सरकारी नोकरीसाठी नियुक्त केले जातात. आयएएस अक्षत जैन यांनी खूप मेहनत घेऊनही पहिल्या यूपीएससी परीक्षेत अनुत्तीर्ण झाले. पण त्यांनी हार मानली नाही. पुन्हा अभ्यासाला लागले. डबल मेहनत केली आणि आयएएस बनून घरच्यांचे स्वप्न पूर्ण केले.

आयएएस अक्षत जैन यांचे वडील डी.सी.जैन हे नवी दिल्लीतील सेंट्रल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनमध्ये सहसंचालक आहेत. अक्षतची आई सिम्मी जैन जयपूरमध्ये नॅशनल अॅकेडमी ऑफ कस्टम्स, इनडारेक्ट टॅक्सेस अॅण्ड नार्कोटिक्स मध्ये एडीजी म्हणजेच आयआरएस अधिकारी आहेत. अक्षत जैन यांना आयएएस अधिकारी बनण्याची प्रेरण आपल्या आई-वडिलांकडून मिळाली. असे असले तरी अक्षत जैन यांनी कोणत्याही कोचिंग क्लासशिवाय अभ्यास केला. 

पहिला अटेम्प्ट 2 गुणांनी हुकला

अक्षत जैन यांनी जयपूर येथील इंडिया इंटरनॅशनल स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. यानंतर आयआयटी गुवाहटीमधून  बीटेक केले. पदवी मिळाल्यानंतर एका महिन्यातच त्यांनी 2017 मध्ये यूपीएससी परीक्षेचा पहिला अटेम्प्ट दिला. पण यात त्यांना यश मिळाले नाही. अवघ्या 2 गुणांसाठी ते यूपीएससीमध्ये अनुत्तीर्ण झाले. यामुळे थोडेसे निराश झाले पण हार मानली नाही. पुन्हा यूपीएससी परीक्षेच्या तयारीला लागले. 

एक वर्ष वाया गेल्यानंतर अक्षत जैन यांनी आपल्या अभ्यासाची स्टॅटर्जी बदलली. आयआयटी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी बंगळूरच्या सॅमसंग आर अॅंड डी इंस्टिट्यूटमध्ये काही काळ नोकरीदेखील केली होती. अभ्यासात थोडा वेळ काढून ते स्वत:ला रिलॅक्स करत असत. मित्रांशी गप्पा मारत असत. यामुळे त्यांना फोकस वाढवण्यास मदत झाली. 

मार्कशिट व्हायरल

आयएएस अक्षत जैन यांची यूपीएससीची मार्कशीट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. अक्षत जैनने 2018 मध्ये झालेल्या यूपीएससी परीक्षेत दुसरा रॅंक मिळवला होता. एकूण 2050 गुणांपैकी 1080 गुण मिळवले होते. अक्षतपासून प्रेरणा घेत तुम्हीदेखील यूपीएससीचा अभ्यास करु शकता.