नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत भाजपाने मोठी आघाडी घेतली आहे. राज्यातील 16 नगरपालिकांपैकी 14 पेक्षा अधिक नगरपालिकांवर भाजप आघाडीवर आहे. पहिल्यांदा नगरपालिका बनलेल्या अयोध्यामध्ये भाजपने विजय मिळवला आहे.
याशिवाय गाझियाबाद, अलीगड, सहारनपूर, मथुरा, अलाहाबाद, कानपूर, लखनऊ, वाराणसी, गोरखपूर, झांसी आणि फिरोजाबाद या महत्त्वाच्या जागांवरही भाजपचे उमेदवार पुढे आहेत.
भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट केले, " यूपीतील निवडणुकीत भाजप रामलहरवर विराजमान आहे. 2019 मध्ये वादळाची प्रतीक्षा आहे.
उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य म्हणाले की, "लोकांचा भाजपवरचा विश्वास दिसून येतो. सबका साथ सबका विकासच्या नीतीवर भाजपने शिकामोर्तब केला आहे. हा विजय सरकार, संघटना आणि जनतेचा भाजपवर असलेला लोकांचा विश्वासामुळे झाला आहे. आम्हाला सरकारच्या माध्यमातून लोकांची सेवा करायची आहे.'