जम्मू-काश्मीर : राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी बादशाह युनिवर्सिटीच्या दोन विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात हा प्रकार घडलाय.
बुधवारी बाबा गुलाम शाह बादशाह युनिवर्सिटीमध्ये एका कार्यक्रमात राष्ट्रगीत सुरु असताना दोन विद्यार्थी उभे राहिले नाहीत. या कार्यक्रमात राज्यपाल एन एन वोहरा हे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. दोन विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर विद्यापीठातीलही काही विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीताचा अवमान करणा-या विद्यार्थ्यांचा निषेध केलाय.
या घटनेचा व्हिडिओही समोर आला असून यात उपस्थित सर्व लोक राष्ट्रगीतासाठी उभे झाले मात्र काही विद्यार्थी आपल्या जागेवर बसून सेल्फी घेण्यात मग्न होते. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यातील किश्तवाडमध्ये राष्ट्रगीतासाठी उभे न राहिलेल्या एका अधिका-या विरोधात आंदोलन केल्याने विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्यात आला होता. असिस्टंट कमिश्नर असलेला हा अधिकारी येत असताना राष्ट्रगीत सुरू होतं पण हा अधिकारी एका जागेवर थांबला तर नाहीच उलट जागेवर जाऊन बसला.