परीक्षेत तुम्हीही कधीतरी कठीण प्रश्नाचं उत्तर देवाचं नाव घेत लिहिलं असेल. स्पर्धा परीक्षेत मायनस मार्किंग असलं तर शक्यतो हुशार विद्यार्थी चुकीचं उत्तर लिहिण्याऐवजी प्रश्न सोडून देतात. मात्र शालेय परीक्षेत उत्तर चुकीचं असलं तरी गुण कमी केले जात नसल्याने प्रश्न सोडण्यापेक्षा तो सोडवण्यावर विद्यार्थ्यांचा भर असतो. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हालाही हसू आवरणार नाही. या व्हिडीओत विद्यार्थी देवाचा धावा करत उत्तर लिहिताना दिसत आहे.
व्हायरल व्हिडीओत विद्यार्थी वर्गात शेवटच्या बाकावर बसलेला दिसत आहे. मात्र प्रश्नपत्रिका हाती पडल्यानंतर विद्यार्थ्याला चांगलाच घाम फुटल्याचं दिसत आहे. त्यामुळे विद्यार्थी देवाचा धावा करताना दिसत आहे. पेपरसमोरच हात जोडून देवाची प्रार्थना करत आहे. त्यानंतर पेपरवर पेन्सिल हातात घेत फिरवतो आणि प्रश्नाच्या उत्तरावर टिक करतो.
‘तुक्का’ लगाकर प्रश्न हल करने की सही ‘विधि.’ pic.twitter.com/Ir8t3DVzWZ
— Awanish Sharan (@AwanishSharan) June 2, 2022
हा व्हिडीओ आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओखाली कॅप्शनमध्ये अधिकाऱ्याने लिहिलं आहे की, 'तुक्का' लगाकर प्रश्न हल करने की सही 'विधी'.
आतापर्यंत 60 हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तसेच नेटकरी हा व्हिडीओ वेगवेगळ्या सोशल मीडियावर शेअर करत मजेशीर कमेंट्स करत आहेत. एका युजर्सने लिहिलं आहे की, 'कुठून येतात अशी लोकं', दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, 'तुक्का लावण्याचा प्रकार एकदम भन्नाटच आहे'