जहाज बुडू लागल्याने समुद्रात मारल्या उड्या, 11 तास समुद्रात जगण्यासाठी संघर्ष

तौक्ते चक्रीवादळाने गुजरात आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.

Updated: May 19, 2021, 05:05 PM IST
जहाज बुडू लागल्याने समुद्रात मारल्या उड्या, 11 तास समुद्रात जगण्यासाठी संघर्ष title=

मुंबई : तौक्ते चक्रीवादळाने गुजरात आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. मुंबईजवळील अरबी समुद्रात पी 305 हे जहाज अडकल्यानंतर भारतीय नौदलाने अनेकांचे जीव वाचवले. सर्व प्रयत्नांनंतर एकूण 184 लोकांना वाचवण्यात यश आलं. परंतु 14 जणांचा मृत्यू झाला.

बार्ज 305 वर अडकलेल्या अमितकुमार कुशवाह यांना जेव्हा भारतीय नौदलाच्या पथकाने वाचवले तेव्हा त्यांनी काय परिस्थिती होती. हे सांगितले. अमितकुमार कुशवाहा यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा वादळाचा परिणाम तीव्र झाला, तेव्हा बार्ज समुद्रात बुडू लागला, तेव्हा त्यांच्याकडे समुद्रात उडी घेण्याशिवाय मार्ग नव्हता. त्यांच्या मते, ते सुमारे 11 तास लाइफ गार्डच्या मदतीने समुद्रात होते, त्यानंतर नौदलाने येऊन त्यांना वाचवले.'

सोमवारी चक्रीवादळाचा परिणाम समुद्री भागात दिसायला सुरुवात केली. तेव्हापासून समुद्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू होती आणि भारतीय नौदलाने कमांड घेतली.

बुधवारी भारतीय नौदलाची कारवाई सुरूच होती. पी 305 या बार्जवर अडकलेल्या उर्वरित लोकांना बाहेर काढण्यात आले. आतापर्यंत 14 मृतदेह बाहेर काढण्यात आले असले तरी एकूण 184 लोकांची सुटका करण्यात आली आहे. भारतीय नौदलाचे ऑपरेशन अजूनही सुरू आहे.

जेव्हा नौदलाने इतर अडकलेल्या कर्मचाऱ्यांना बाहेर आणले तेव्हा त्यातील काही भावूक झाले. ते म्हणाले की, कालपासून ते पाण्यात अडकले होते. अशा परिस्थितीत अखेर भारतीय नौदलाने त्याला वाचवले. तौक्ते चक्रीवादळामुळे महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये 60 हून अधिक मृत्यूची नोंद झाली आहे.