जम्मू-काश्मीरात जाणवले भूकंपाचे झटके, इतकी होती तीव्रता

 आज जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के बसले आहेत. या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तान-ताजिकिस्तानची सीमा असल्याचे मानले जात आहे. 

Updated: Jan 1, 2022, 07:57 PM IST
जम्मू-काश्मीरात जाणवले भूकंपाचे झटके, इतकी होती तीव्रता title=

श्रीनगर : 2022 वर्षाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. 1 जानेवारी रोजी सकाळी जम्मू-काश्मीरमधील कटरा येथे माता वैष्णोच्या दर्शनासाठी गेलेल्या चेंगराचेंगरीत 13 भाविकांचा मृत्यू झाल्याची बातमी आली. दुसरीकडे आज जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के बसले आहेत. या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तान-ताजिकिस्तानची सीमा असल्याचे मानले जात आहे. या भूकंपात कोणत्याही मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. जम्मू-काश्मीरमध्ये ६.४५ वाजता हे धक्के जाणवले.

अफगाणिस्तानमधील फैजाबादच्या दक्षिणपूर्व ८४ किमी अंतरावर ५.१ रिश्टर स्केलचा भूकंप झाला अशी माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिलीये.

वैष्णो मातेच्या दरबारात चेंगराचेंगरी

जम्मू-काश्मीरमधील वैष्णो देवी भवनात नवीन वर्षाच्या दिवशी सकाळी चेंगराचेंगरी होऊन १३ भाविकांचा मृत्यू झाला, तर १५ जण जखमी झाले. या दुर्घटनेतील प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, नववर्षाला वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने लोक आले होते. गर्दी एवढी होती की लोकांना बाहेर जायला रस्ताच नव्हता.

खांबावर चढून लोकांनी वाचवला जीव

या अपघातात लोकांची इकडे-तिकडे धावपळ सुरू झाली. लुधियाना येथील एका प्रवाशाने सांगितले की घटनास्थळी असलेल्या लोकांना नियंत्रित करण्याऐवजी पोलिसांनी लाठीमार केला. त्याचवेळी दुसऱ्या एका महिलेने स्लिपनुसार प्रवाशांना मंदिरात पाठवायला हवे होते, असे सांगितले. बेहिशोबीपणे लोकांना आत पाठवले गेले. अनेकांनी खांबावर चढून आपला जीव वाचवल्याचे या महिलेने सांगितले.