अमरनाथ यात्रेसाठी ३० हजार जवान तैनात

अमरनाथ यात्रेवर यंदाही दहशतवादाचं सावट कायम आहे... परंतु, यंदा धोका अधिक असल्याचं दिसतंय. गुप्तचर संघटनांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरनाथ यात्रेकरुंवर ग्रेनेड आणि आयईडीच्या साहाय्यानं दहशतवादी हल्ला करू शकतात. 

Updated: Jun 17, 2017, 01:41 PM IST
अमरनाथ यात्रेसाठी ३० हजार जवान तैनात title=

श्रीनगर : अमरनाथ यात्रेवर यंदाही दहशतवादाचं सावट कायम आहे... परंतु, यंदा धोका अधिक असल्याचं दिसतंय. गुप्तचर संघटनांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरनाथ यात्रेकरुंवर ग्रेनेड आणि आयईडीच्या साहाय्यानं दहशतवादी हल्ला करू शकतात. 

त्यामुळे, यंदा सुरक्षा दलांसोबतच ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्यानं अमरनाथ यात्रेकरुंच्या सुरक्षेची खबरदारी घेण्यात येणार आहे. 

येत्या २९ जूनपासून जम्मू-काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रा सुरू होतेय. या दरम्यान स्थानिक पोलीस, निमलष्करी दल आणि लष्कराचे जवळपास ३० हजार जवान सुरक्षेसाठी तैनात असणार आहेत.