Stocks to Buy | 30 रुपयांहून स्वस्त किंमतीचा स्टॉक; छप्परफाड कमाईची संधी

स्टॉक मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी योग्य स्टॉकची निवड करणे खूप महत्वाचे आहे. 

Updated: Dec 29, 2021, 12:19 PM IST
Stocks to Buy |  30 रुपयांहून स्वस्त किंमतीचा स्टॉक; छप्परफाड कमाईची संधी title=

मुंबई : स्टॉक मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी योग्य स्टॉकची निवड करणे खूप महत्वाचे आहे. चांगल्या स्टॉकच्या निवडीमुळे तुम्हाला दमदार परतावा मिळवता येतो. त्यामुळे गुंतवणूकीआधी योग्य शेअरची निवड करण्यासाठी एक्सपर्टचा सल्ला घ्यायला हवा. तुम्हालाही गुंतवणूक करायची असेल तर, मार्केट एक्सपर्ट संदीप जैन यांनी एका उत्तम फंडामेंटल असलेल्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ल दिला आहे.

संदीप जैन यांना निवडला स्टॉक

मार्केट एक्सपर्ट संदीप जैन यां KCP शुगर अँड इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन लि. मध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

कंपनीचे फंडामेंटल्स

ही कंपनी 1941 पासून कार्यरत आहे. या कंपनीचा मार्केट कॅप 300 कोटी रुपये आहे आणि तिने देशात 2 प्लांट उभारले आहेत. या कंपनीची साखर उत्पादन क्षमता 11500 टन आहे

KCP Sugar and Industries Corp Ltd
CMP - 28.75
लक्ष्य - 30

सप्टेंबर तिमाहीचे निकाल

या वर्षी सप्टेंबर तिमाहीत कंपनीने 8.5 कोटी रुपयांचा नफा सादर केला होता, तर गेल्या वर्षी कंपनीला तोटा झाला होता. हा स्टॉक शॉर्टटर्ममध्ये चांगला परतावा मिळवून देऊ शकतो.