Stock to Buy | या IT स्टॉकमध्ये तुफान रिटर्न्स देण्याची क्षमता; एक्सपर्ट्सची चॉइस

शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे योग्य शेअरमध्ये पैसा गुंतवून तुम्हाला मोठा नफा कमावता येतो

Updated: Oct 29, 2021, 03:50 PM IST
Stock to Buy | या IT स्टॉकमध्ये तुफान रिटर्न्स देण्याची क्षमता; एक्सपर्ट्सची चॉइस title=

मुंबई : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे योग्य शेअरमध्ये पैसा गुंतवून तुम्हाला मोठा नफा कमावता येतो. परंतु त्यासाठी गरजेचे आहे. शेअर्सची निवड. त्या शेअरचा अभ्यास/संशोधन महत्वाचे आहे. जर तुम्ही मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी चांगल्या शेअरच्या शोधात असाल तर, आम्ही तुमच्यासाठी स्वस्त आणि चांगला परतावा देण्याची क्षमता ठेवणारा शेअर घेऊन आलो आहोत.

मार्केट एक्सपर्ट संदिप जैन यांनी Cybertech या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. वॅल्युएशनच्या हिशोबाने हा शेअर स्वस्त आहे. कंपनीची ग्रोथ शानदार आहे. कंपनीचा जगभरात अनेक ठिकाणी व्यवसाय आहे. तसेच डॉलर मजबूत झाल्याने टेक कंपन्यांना फायदा झाला आहे.

गुंतवणूकीचा सल्ला
कंपनीचा 5 वर्षांचा CAGR 57 % आहे. तर कंपनीवर सध्या कोणतेही कर्ज नाही. मागील वर्षातील सप्टेंबर तिमाहीमध्ये 4 कोटींचा नफा झाला असून यावर्षीच्या सप्टेंबरच्या तिमाहीमध्ये 8.50 कोटींचा नफा झाला आहे. तसेच गुंतवणूकदारांनाही चांगली डिविडंड मिळाला आहे. मागील चार तिमाहीमध्ये कंपनीचा परफॉमन्स चांगला राहिला आहे. 

Buy Call Cybertech
CMP 163.85
Target 190/210
अवधी  6-9 महिने