मुंबई : भारतीय बाजारांमध्ये सणासुदीच्या दिवसांमध्ये सोन्याला चांगली मागणी असते. त्यामुळे मागणी पुरवठ्याच्या सिद्धांतानुसार सोन्याच्या दरातही चढ - उतार होत असते. सोन्याच्या दरांवर बाजारातील अनेक गोष्टी प्रभाव पाडतात. त्यानुसारही सोन्याचे दर कमी जास्त होत असतात.
मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX)मध्ये सोन्याचे दर आज (29 ऑक्टोबर 2021) 47850 रुपये प्रति तोळे इतकी होती. एमसीएक्सवर सोन्याच्या दरांत कालपेक्षा 100 रुपये प्रति तोळ्याने घसरण झाली आहे. एमसीएक्सवर चांदीच्या दरांमध्येही काहीशी घसरण नोंदवली गेली. दुपारी 3 वाजता चांदीचे दर 64 हजार 764 रुपये प्रति किलोवर ट्रेड करीत होता.
मुंबईतील सोन्याचे दर
24 कॅरेट 48,050 रुपये प्रति तोळे
मुंबईतील चांदीचे दर
64 हजार 600 रुपये प्रति किलो
मागील वर्षी सोन्याच्या दरांमध्ये वाढ झाली होती. ऑगस्टमध्ये सोन्याचे दर 56 हजारावर गेले होते. येत्या काळातही सोन्याचे दर पुन्हा 55 हजारी टप्पा गाठू शकतात. त्यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी सराफा बाजारात गजबज पाहायला मिळत आहे.