Best Pick | या फार्मा कंपनीचा स्टॉक मिळवून देणार बंपर रिटर्न्स; एक्पर्ट्सदेखील बुलिश

शेअर बाजारात पैसा गुंतवण्यासाठी मार्केट एक्सपर्ट संदिप जैन यांनी दमदार स्टॉक निवडला आहे

Updated: Oct 28, 2021, 02:51 PM IST
Best Pick | या फार्मा कंपनीचा स्टॉक मिळवून देणार बंपर रिटर्न्स; एक्पर्ट्सदेखील बुलिश title=

मुंबई : शेअर बाजारात पैसा गुंतवण्यासाठी मार्केट एक्सपर्ट संदिप जैन यांनी दमदार स्टॉक निवडला आहे. शेअर बाजारात चांगले रिटर्न्स मिळण्यासाठी परफेक्ट स्टॉकची निवड महत्वाची ठरते. संदीप जैन यांनी Jagsonpal Pharma वर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. 

जगसोनपाल फार्मा
जगसोनपाल फार्मा ही खुप जूनी फार्मा कंपनी आहे. त्याची मार्केट कॅप 400-425 कोटी आहे. या स्टॉकची चर्चा जास्त होत नाही. कंपनीचा मार्केट कॅप 400 -425 कोटींचा असून फंडामेंटल्स अतिशय मजबूत आहे. मागील 4 तिमाहीमध्येदेखील कंपनीने चांगले रिझल्ट जारी केले असून कंपनीचे काही ब्रॅंड भारतात लोकप्रिय आहेत. स

जाणून घ्या कंपनीचे फंडामेंटल्स
कंपनीचे मागील 3 वर्षात प्रॉफिट प्रॉफिटचा CAGR 51 टक्के होता. तर मागील पाच वर्षात हा 40 टक्के इतका होता. कंपनीने आपले कर्ज कमी केले असून आता फक्त 7 कोटी कर्ज आहे. 

शानदार नफा
जनसोनपोल फार्माता सप्टेंबर 2020 मध्ये 4 कोटींचा PAT  (Profit After Tax) होता. कंपनीत प्रमोटर्सची होल्डिंग 70 टक्के आहे. यामुळे कंपनीवर विश्वास आणखी वाढतो.

Jagsonpal Pharma Buy call
CMP 181.85 
TARGET 190/200