मुंबई : जर तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये 2022 मध्ये दमदार परतावा देणारा स्टॉक घेऊ इच्छिता तर BASF या कंपनीचा स्टॉक चांगली निवड ठरू शकते. जगातील सर्वात मोठ्या केमिकल कंपन्यांपैकी ही एक कंपनी आहे. गेल्या अनेक दशकांपासून ते भारतात कार्यरत आहे. मार्केट एक्सपर्ट Enoch वेंचर्सचे MD & CEO विजय चोप्रा यांनी BASF च्या स्टॉकमध्ये खरेदीचा सल्ला दिला आहे. चोप्रा यांनी या स्टॉकसाठी 3600-3700 रुपयांचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.(basf india ltd)
चोप्रा यांनी शेअरवर 3600-3700 रुपयांच्या लक्ष्य किंमतीसह खरेदी सल्ला दिला आहे. कंपनीचे फंडामेंटल्स मजबूत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
विजय चोप्रा सांगतात की, BASF गेल्या अनेक दशकांपासून भारतात व्यवसाय करीत आहे. भारतीय रासायनिक क्षेत्राची प्रगती चांगली आहे. या क्षेत्रात 10-15% ची CAGR वाढ दिसून येत आहे.
2019 मध्ये या क्षेत्राचा बाजार आकार $178 अब्ज होता. 2025 पर्यंत 304 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. यामध्ये लक्षणीय वाढ अपेक्षित आहे.
केंद्र सरकारची महत्वकांशी योजना असलेली 'मेक इन इंडिया'चा BASF ला फायदा होऊ शकतो. त्यामुळे शेअर 3600 ते 3700 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. 2022 मध्ये हा शेअर गुंतवणूकदारांना मालामाल करू शकतो.