Stock market crash | बाजारात तुफान पडझड; लाखो कोटी एका सत्रात स्वाहा

stock market major crash: रशियाने युक्रेनवर सैन्य कारवाईला सुरूवात केल्याने जगभरातील शेअर बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण नोंदवण्यात आली. त्याचा परिणाम भारतीय बाजारांमध्येही दिसून आला. 

Updated: Feb 24, 2022, 12:25 PM IST
Stock market crash | बाजारात तुफान पडझड; लाखो कोटी एका सत्रात स्वाहा title=

मुंबई : stock market major crash: रशियाने युक्रेनवर सैन्य कारवाईला सुरूवात केल्याने जगभरातील शेअर बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण नोंदवण्यात आली. त्याचा परिणाम भारतीय बाजारांमध्येही दिसून आला. 

बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा निर्देशांक सेंन्सेक्स तब्बल 1600 हून अधिक अंकांनी घसरून 55100 वर पोहचले होते. तर, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निर्देशांक निफ्टी 500हून अधिक अंकांनी घसरून 16500 पर्यंत घसरला होता.

गेल्या काही दिवसांपासून मोठ्या बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण होत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचे लाखो कोटी रुपये बुडाले आहेत. जगावर अद्यापही युद्धाचे सावट कायम आहे. त्यामुळे मंदीचे ढग आणखी किती दिवस बाजारावर राहतील हे सांगणं सध्या तरी कठीण आहे.

कच्च्या तेलाचे भाव कडाडले

युक्रेन - रशियाच्या युद्धामुळे भारतात मोठ्या प्रमाणात महागाई वाढू शकते. कोणत्या वस्तूंच्या किमती वाढू शकतात, याबद्दल तज्ज्ञांनी माहिती दिली आहे. यामध्ये नैसर्गिक वायू, पेट्रोल, डिझेल, गहू, धातू महाग होऊ शकतं. तर एलपीजी, केरोसीन अनुदान वाढू शकतं.

- रशिया-युक्रेन युद्धाचे पडसाद

- कच्चे तेल प्रति बॅरल 100 डॉलरच्यावर

- गेल्या 7 वर्षांतला उच्चांक

- भारतीय शेअर बाजार गडगडला

- सोन्याची वाटचाल 52 हजारांच्या दिशेने