Stock Market | सेंसेक्सची पहिल्यांदाच 61 हजारी रेकॉर्डब्रेक उंची; IT-AUTO शेअर्स मालामाल

 शेअर बाजारात आज शानदार तेजी दिसून आली. आज मार्केट सुरू होताच सेंसेक्स आणि निफ्टीने आपला नवीन रेकॉर्ड बनवला. 

Updated: Oct 14, 2021, 11:51 AM IST
Stock Market | सेंसेक्सची पहिल्यांदाच 61 हजारी रेकॉर्डब्रेक उंची; IT-AUTO शेअर्स मालामाल title=

मुंबई : शेअर बाजारात आज शानदार तेजी दिसून आली. आज मार्केट सुरू होताच सेंसेक्स आणि निफ्टीने आपला नवीन रेकॉर्ड बनवला. सेंसेक्सने पहिल्यांदाच 61 हजाराचा टप्पा गाठला. तसेच निफ्टीने देखील 18250 अंकापर्यंत उसळी घेतली. बाजारात आज सर्व सेक्टर्समध्ये तेजी दिसून आली. सर्वात जास्त तेजी आयटी तसेच ऑटो शेअर्समध्ये दिसून आली. आजच्या व्यवसायात टॉप गेनर्समध्ये इंन्फोसिस, TECHM,L&T, ITC, MARUTI, ULTRACEMCO,NTPC, TATASTEEL, BAJAJFINSV आणि HDFC BANK हे शेअर्स आहेत.

ग्लोबल मार्केटमध्ये संमिश्र संकेत
शेअर बाजारात आज ग्लोबल संकेत संमिश्र राहिले आहेत. बुधवारी अमेरिकी बाजारात मिक्स ट्रेंड दिसून आला आहे. Dow Jones मध्ये काहीशी घसरण नोंदवली गेली होती. नॅस्डेकमध्ये 106 अंकांची तेजी दिसून आली होती. अमेरिकेत महागाई चिंतेचा विषय बनली आहे. बॉन्ड यील्डमध्ये तेजी आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती महागाईत भर घालत आहेत. 

आशियातील बाजारांमध्येही संमिश्र संकेत मिळत होते. SGX निफ्टी आणि निक्केई काहीशा तेजीत ट्रेज करीत होत. तर स्ट्रेट टाइम्समध्ये घसरण नोंदवली गेली.