High Return Stocks 2021 | 'या' कंपनीच्या शेअरची 3 महिन्यात तगडी कमाई, 3 महिन्यात 1 लाखाचे 7 लाख 44 हजार

High Return Stocks : या शेअरमध्ये गुंतवणूक करणारे चांगलेच मालामाल झाले आहेत.  

Updated: Aug 12, 2021, 05:09 PM IST
High Return Stocks 2021 | 'या' कंपनीच्या शेअरची 3 महिन्यात तगडी कमाई, 3 महिन्यात 1 लाखाचे 7 लाख 44 हजार title=

High Return Stocks 2021: शेअरमध्ये गुंतवणूक करताना प्रत्येक जण हा आपला जास्तीत जास्त फायदा व्हावा, या हेतूनेच गुंतवणूक करत असतो. कधी गुंतवणूकदाराला जबरदस्त तोटा सहन करावा लागता. मात्र केव्हा केव्हा गुंतवणूकदारांना काही शेअर्स हे अशी कमाई करुन देतात, की त्यांनी त्याबाबत विचारही केला नसेल. स्टील स्ट्रीप्स इन्फ्रास्ट्रक्चर (Steel Strips Infrastructures) या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना अवघ्या 3 महिन्यांमध्ये तब्बल 644 टक्के परतावा दिला आहे. त्यामुळे या कंपनीत गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांच्या आनंदाचा पारावा राहिलेला नाही. या पेनी स्टॉक्समध्ये तुम्हीही पैसे गुंतवले असते तर तुमचाही तगडा फायदा झाला असता. पण या अशा शेअर्समध्ये गुंतवणूक करणं हे जोखीमेचं असतं, कारण याच्या आर्थिक आकड्यातील आणि शेअर्स किंमतीतील आकड्यात तफावत असते. पेनी स्टॉ्कस म्हणजे दर्शनी मूल्यापेक्षा कमी बाजारभाव असलेले शेअर्स. (Steel Strips Infrastructures share made 1 lakh to 7 lakh 44 thousand gav 644 percent only 3 months)

3 महिन्यात 644 टक्के रिटर्न 

या कंपनीच्या शेअरची किंमत 11 मे 2021 ला 4 रुपये 42 पैसे इतकी होती. तिच किंमत आता 32 रुपये 90 पैसे इतकी झाली आहे. थोडक्यात काय तर फक्त 3महिन्यांच्या कालावधीत या शेअरने आपल्या शेअरधारकांना 644 टक्क्यांचा मजबूत फायदा करुन दिलाय. BSE च्या यादीत या शेअरने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. या कालावधीत BSE सेन्सेक्सने  11.42 टक्क्यांनी रिटर्न मिळवून दिला आहे. दरम्यान या कंपनीच्या शेअरची किंमत वर्षभराआधी 6 रुपयांच्या आसपास होती. पण वर्षभरात शेअरने विक्रमी झेप घेतली आहे.   

50 हजाराचे थेट 3 लाख 72 हजार.... 

जर या कंपनीचे शेअरमध्ये तुम्ही 11 मे ला 50 हजार गुंतवले असते, तर त्याची आजची किंमत ही 3 लाख 72 हजार इतकी असती.

कंपनी सलग 5 वर्ष तोट्यात.... 

Steel Strips Infrastructures च्या शेअरमध्ये 2021 पासून आतापर्यंत 692.84 टक्क्यांनी वाढ झाली आहे. एका महिन्यात शेअरमध्ये 164 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या 21 ट्रेडिंग सेशनमध्ये 164 टक्क्यांनी वेग पाहायला मिळाला. शेअरमध्ये खचकन वाढ होत असली तरी, कंपनीला तोटा सहन करावा लागतोय. आम्ही गेल्या 5 वर्षांपासून आर्थिक तोटा सहन करतोय, असं कंपनीकडून सांगितलंय जातंय. जून तिमाहीच्या शेवटापर्यंत कंपनीत प्रमोटर्सची भागीदारी ही 50.22% इतकी होती. तर पब्लिक शेअरहोल्डिंग 49.78% इतकी होती. त्यामुळे गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करण्याआधी शेअर मार्केट तज्ज्ञांचा सल्ला जरुर घ्यायला हवा.