नवी दिल्ली : अनेक बॅंक तुम्हाला एटीएम कार्डवर तुमच्या आवडीचे फोटो लावण्याची सुविधा देतात. अशा पद्धतीने कार्ड बनवण्यासाठी बॅंक ग्राहकांकडून चार्ज देखील वसूल करतात. दरम्यान स्टेट बॅंक ऑफ इंडीयाने (State Bank of India)लहान मुलांसाठी फोटो असलेलं एटीएम कार्ड आणलंय. यामध्ये मिनिमम बॅलेंसची (Minimum balance) गरज नसणार आहे.
पहिले पाऊल आणि उड्डाण या योजनेअंतर्गत बॅंक लहान मुलांचे खाते उघडते. या खात्याअंतर्गत लहान मुलांच्या नावाने एटीएम कार्ड दिले जाते. लहान मुलांना दिलेल्या एटीएम कार्डवर त्यांचा फोटो असतो. या खात्यावरुन दिल्या गेलेल्या एटीएम कार्डमधून ५ हजार रुपयांपर्यंत रक्कम काढू शकतो आणि इतक्या रुपयांची शॉपिंग देखील करु शकतो.
या खात्यावर मुलांना २ हजारापर्यंत टॉपअप मिळू शकतो. या दोन्ही खात्यांवर मिळणारे व्याज ४ टक्के म्हणजे बचत खात्याप्रमाणे असेल. या बॅंक अकाऊंटमध्ये मुलांना इंटरनेट बॅंकींग, मोबाईल बॅंकींग, एटीएम कार्ड, चेक बुक फॅसिलिटी सारख्या सुविधा दिल्या जात आहेत. या अकाऊंटचे २ प्रकार आहेत. एक अकाऊंट १० वर्षांच्या आतील मुलांसाठी आहे. आणि पेहली उडान (Pehli Udaan) १० वर्षांच्या वरील मुलं जी सही (Uniformly Signature) करु शकतात त्यांच्यासाठी आहे.
अल्पवयीन मुलं आपल्या आई-वडीलांसोबत जॉईंट अकाऊंट उघडू शकतात. आई वडीलांसोबत हे अकाऊंट चालवू शकतात. तर पहीली उडानमध्ये १० वर्षांच्या वरील वयाच्या अल्पवयीन मुलांच्यानावे खाते उघडले जाऊ शकते. ज्याच्या नावावर खाते आहे ते लहान मुलं खातं चालवू शकतं. खाते उघडण्यासाठी केवायसीची गरज नाही.