बिहार : आज देशभरात त्रिपुरारी पौर्णिमेचा आनंद साजरा केला जात आहे. मात्र या उत्साहाला बिहारमध्ये गालबोट लागलं आहे.
गंगा स्नान करताना झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 3 जणांचा मृत्यू झाला असून जखमींची संख्या १० आहे.
बिहारमध्ये बेगुसराय घाटावर स्नान करताना चेंगराचेंगरी झाल्याने तीन जणांनी आपला जीव गमावला आहे. या तिन्ही मृतांमध्ये महिलांचा समावेश आहे.
स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार भाविकांमध्ये काही अफवा पसरल्याने ही चेंगरा चेंगरी झाली आहे. नेमकी कोणती अफवा पसरली याबाबत अजूनही माहिती मिळालेली नाही.
त्रिपुरारी पौर्णिमेला भाविकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे या दुर्घटनेमध्ये अनेक भाविकांना त्रास होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री नितेश कुमार यांनी या दुघर्टनेतील मृतांच्या परिवाराला चार लाखांची मदत घोषित केली आहे. तर जखमींचा खर्चदेखील सरकार करणार आहे.