चीनच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी भारताची नवी खेळी

डोकलाम भागात २०१६ मध्ये भारत आणि चीन दरम्यान  ७३ दिवसांपर्यंत तणाव सुरू होता

Updated: Dec 19, 2018, 11:51 AM IST
चीनच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी भारताची नवी खेळी title=

नवी दिल्ली : भारताच्या उत्तर - पूर्व भागातून चीनची भारतात होणारी घुसखोरी रोखण्यासाठी यंत्रणेनं आता कठोर पावलं उचलण्याचं धोरण आखलंय. भारत-नेपाळ आणि भारत-भूटान सीमेवर संरक्षण करणाऱ्या सशस्त्र सीमा दलाचे (एसएसबी) जवान यंदा या दोन्ही भारतीय सिमेवर एकूण ७२ चौक्या उभारण्याचं काम सुरू करणार आहे. एका उच्च अधिकाऱ्यानं मंगळवारी ही माहिती दिलीय. 

सीमेवर सुरक्षेशी निगडीत संरचना आणि कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यावरून अर्धसैन्य दलानं सिक्कीम आणि अरुणालचल प्रदेशात असा १८ चौक्या उभारल्यात. यातील काही चौक्या डोकलामजवळ आहेत. याच डोकलाम भागात २०१६ च्या उन्हाळ्याच्या दिवसांत भारत आणि चीनच्या सुरक्षा दलादरम्यान ७३ दिवसांपर्यंत तणाव सुरू होता.

एसएसबीचे महासंचालक एस. एस. देसवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, नव्या चौक्या नेपाल आणि भूटान लगतच्या खुल्या सीमाभागांच्या संरक्षणासाठी उभारल्या जात आहेत. 

एसएसबीच्या ५५ व्या स्थापना दिवसाला मीडियाशी बोलताना देसवाल यांनी नेपाळ आणि भूटानसोबत भारतीय सीमेवर एसएसबी आधारभूत संरचनेचा विकास आणि कर्मचाऱ्यांना तैनात करण्याचं काम करतंय.