स्पाईस जेटचा रेड हॉट इंटरनॅशनल सेल, केवळ इतक्या रुपयांत तिकिट

 या सेल अंतर्गत ग्राहकांना ३ हजार ९९९ रुपयांपासून तिकिट उपलब्ध होणार आहे. 

Updated: Aug 26, 2019, 04:06 PM IST
स्पाईस जेटचा रेड हॉट इंटरनॅशनल सेल, केवळ इतक्या रुपयांत तिकिट  title=

नवी दिल्ली : स्पाइसजेटने (SpiceJet) रेड हॉट इंटरनॅशनल सेल आणला आहे. या सेल अंतर्गत ग्राहकांना ३ हजार ९९९ रुपयांपासून तिकिट उपलब्ध होणार आहे. २६ ते ३० ऑगस्ट दरम्यान यासाठी बुकींग केली जाऊ शकते. या तिकीटावर ३१ मार्च २०२० पर्यंत प्रवास केला जाऊ शकतो.

भाडे दर 

विदेश यात्रा करण्याची इच्छा पूर्ण करणाऱ्यांना या संधीचा फायदा घेता येऊ शकेल. चेन्नई ते कोलंबो, कोलकाता आणि गुहावटी ते ढाकाचा प्रवास केवल ३ हजार ९९९ रुपयांमध्ये केला जाऊ शकतो. तसेच कोची ते माले चा प्रवास केवळ ४ हजार २९९ रुपयांमध्ये होऊ शकतो. बॅंकॉक ते कोलकाताचे तिकिट ४ हजार ६९९, दुबई ते मुंबईचे भाडे ५ हजार ३९९, मुंबईतून बॅंकॉंकचे भाडे ६ हजार ८९९ रुपये आणि बॅंकॉक-दिल्लीचे भाडे ७ हजार १९९ रुपये आहे.