उमर खालिद प्रकरणात दिल्ली पोलिसांकडून 2 आरोपींना अटक

काय आहे हे प्रकरण 

उमर खालिद प्रकरणात दिल्ली पोलिसांकडून 2 आरोपींना अटक  title=

मुंबई : देशद्रोहाचा आरोप असलेला आणि जेएनयूचा विद्यार्थी असलेल्या उमर खालिदवर हल्ला करण्यात आला. या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने दरवेश शाहपुर आणि नवीन दलाल याला बऱ्याच तासांच्या चौकशीनंतर अटक केली आहे. 

चौकशीत आरोपींनी असं सांगितलं की, उमर खालिदवर हल्ला करणं हा त्यांचा उद्देश नव्हता. तर त्या दिवशी कॉन्सिट्यूशन क्लबमध्ये जो 'खौफ से आजादी' हा कार्यक्रम होता तो बंद करण्यासाठी आम्ही तेथे आलो होते. तेव्हा तो प्रोग्राम वेळेत सुरू झाला नाही आणि हे बाहेर आले. बाहेर उमर खालिद भेटला आणि त्याच्याशी वाद सुरू झाला. 13 ऑगस्टला Consitution क्लबच्या बाहेर उमर खालिदने दावा केला होता की, त्याच्यावर फायरिंग केली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची जबाबदारी स्पेशल सेलकडे सोपवण्यात आली आहे. 

खालिदसोबत कॉन्सिट्यूशन क्लबमध्ये गेला असल्याची माहिती सैफीने दिली होती. आम्ही चहा प्यायला जात असताना तीन लोक आमच्या दिशेने आले. त्यातील एकाने खालिदला पकडलं त्याचा विरोध करत खालिदने स्वतःला सोडण्याचा प्रयत्न केला. तसेच सैफीने सांगितलं की, गोळीचा आवाज होताच तिथे अव्यवस्था पसरली.