राज्यातील सद्यस्थितीचा अहवाल आल्यानंतरच सोनिया-उद्धव भेट

 काँग्रेस पक्षप्रमुख सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा 

Updated: Nov 15, 2019, 07:39 AM IST
राज्यातील सद्यस्थितीचा अहवाल आल्यानंतरच सोनिया-उद्धव भेट title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांच्या महाशिवआघाडीचे सरकार सत्ता स्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे. त्यासंदर्भातील सकारात्मक हालचाली सुरु झाल्या आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात सत्तास्थापनेसंदर्भातील चर्चा सुरु आहेत. रविवारी काँग्रेस पक्षप्रमुख सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा होईल असे सांगण्यात येत आहे. पण महाराष्ट्रातील सद्यस्थितीचा अहवाल आल्यानंतरच सोनिया-उद्धव भेट होणार आहे. 

Image result for uddhav and sonia zee news

सोनिया गांधी यांच्यासोबत चर्चा होण्याआधी अहमद पटेल हे राज्यातील स्थितीचा अहवाल सोनिया गांधींना देणार आहेत. मुंबईत जी बैठक झाली त्याबाबत हा अहवाल असणार आहे. त्यानंतर दिल्लीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची बैठक होणार आहे. 

रविवार 17 नोव्हेंबर रोजी पवार आणि सोनिया गांधी यांची भेट होणार आहे. या भेटीत जर सगळं नीट झालं तर काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची एकत्र  बैठक होईल. सगळं मार्गी लागल्यानंतर सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांचीही भेट होण्याची शक्यता आहे.