भाजप कार्यकर्ता महिलेने शेतकरी नेत्याला केली मारहाण

भाजपच्या एका कार्यकर्ता महिलेने वृद्ध शेतकरी नेत्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा प्रकार तामिळनाडूत घडलाय. शेतकऱ्यांचे ज्येष्ठ नेते  पी. अय्याकुन्नू यांना ही मारहाण झाली. ही मारहाण कॅमेऱ्यात कैद झालेय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 9, 2018, 08:31 PM IST
भाजप कार्यकर्ता महिलेने शेतकरी नेत्याला केली मारहाण title=

चैन्नई : भाजपच्या एका कार्यकर्ता महिलेने वृद्ध शेतकरी नेत्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा प्रकार तामिळनाडूत घडलाय. शेतकऱ्यांचे ज्येष्ठ नेते  पी. अय्याकुन्नू यांना ही मारहाण झाली. ही मारहाण कॅमेऱ्यात कैद झालेय.

तामिळनाडूतील शेतकऱ्यांचे नेते पी. अय्याकुन्नू  हे पत्रक वाटत होते. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्या नेलायम्मल यांनी केंद्र सराकरविरोधात पत्रकं वाटली म्हणून कानाखाली मारली आहे. तसेच यावेळी त्यांनी चप्पलही उगाल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी काहींनी मध्यस्थी केल्यानंतर त्यांचा हा वाद मिटला पण अशा प्रकारे एका वरिष्ठ व्यक्तीला मारहाण केल्याने भाजपवर टीका होत आहे.

पी. अय्याकुन्नू  आणि काही शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी रॅली काढली आहे. गेल्या आठवड्यात कन्याकुमारीतून त्यांनी या रॅलीला सुरुवात केली. या रॅलीत ते लोकांना भेटून केंद्र सरकारविरोधातील पत्रकं वाटत आहेत. शुक्रवारी त्यांची रॅली चेन्नईतील श्री सुब्रमनिया स्वामी मंदिरात पोहोचली. त्यावेळी त्यांनी तेथे आलेल्या भाविकांमध्ये पत्रक वाटण्यास सुरुवात केली. त्यावेळी ही मारहाण झाली.