आयुष्यात एकाकीपणा, नैराश्यासारख्या काही गोष्टींचा गुंता हा योग्य त्या वेळी सोडवणं खूपच महत्त्वाचं असतं. एखाद्यावर ही वेळ त्याच्यावर लहानपणी किंवा त्याच्या आयुष्याच्या महत्त्वाच्या टप्प्यातही येऊ शकते. या सर्व समस्यांना संयम आणि धैर्याने सोडवण्याची जास्त गरज असते. परंतु बहुतेक लोक हे करू शकत नाहीत. काही जण शेवटपर्यंत त्याच ओझ्याखाली जगतात. तर काहींचा सहन करण्याचा बांध फुटतो आणि टोकाचं पाऊल उचललं जातं.
असाच काहीसा प्रकार दिल्लीमध्ये (delhi) घडला आहे. दिल्लीतील (Delhi Crime) क्षितीज नावाच्या मुलाने केलेल्या कृत्याने सगळ्यांनाच हादरवून सोडलं आहे. क्षितीजने आपल्या आईची हत्या करत आत्महत्या केलीय (son killed mother). आत्महत्येपूर्वी (suicide) त्याने 77 पानांची सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. यामध्ये त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.
क्षितिजने आधी आपल्या आजारी आईची घरातच हत्या केली. त्यानंतर 4 दिवस तिच्या मृतदेहासोबत राहून नंतर आत्महत्या केली. पण मरण्यापूर्वी क्षितिजने 77 पानी सुसाईड नोट लिहून आपल्या आयुष्यातील सर्व त्रास आणि आईच्या मृतदेहासोबत घालवलेल्या 4 दिवसांचा प्रत्येक क्षण नोंदवला आहे. 250 पानांच्या रजिस्टरच्या शेवटच्या 77 पानांमध्ये नैराश्य, आर्थिक संकट, गरिबी आणि एकाकीपणाशी झुंजणाऱ्या क्षितिजची गोष्ट लिहिली आहे.
क्षितिजने आत्महत्येमध्ये लिहिले आहे की, त्याला दोन वर्षापासून आत्महत्या करायची होती. मरण्यापूर्वी त्याला आईला तिच्या दुःखातून मुक्त करायचे आहे. दर रविवारी त्यांची आई सत्संगाला जात असे. यावेळीही तिथून आई आल्यावर तिच्यासोबत त्याचा थोडा वाद झाला. आईच्या डोळ्यात मोतीबिंदू आहे असं वाटते. आता त्याला मरायचे आहे. आज गुरुवार आहे. त्याने बाईकच्या केबलचा वापर करून आईचा गळा दाबला. जेणेकरुन आईला मरताना वेदना होऊ नयेत.
मृत्यूनंतरही आईचे डोळे उघडे
पुढे क्षितीजने म्हटलं आहे की, केबल जोरात खेचताच 4 ते 5 सेकंदात आई खाली पडली. मेंदूपर्यंत ऑक्सिजन पोहोचला नाही तर मृत्यू होतो हे त्याला माहीत होते. आई पडताच त्याने तिचे डोके आपल्या मांडीत ठेवले. आठ ते दहा मिनिटे त्याने आईचा गळा दाबून ठेवला. तो तोंड दाबून रडत होता. गुरुवारी संपूर्ण दिवस रडत होता. त्याला वडिलांची खूप आठवण येते होती. मृत्यूनंतरही आईचे डोळे उघडे होते. त्याने ते बंद करण्याचा प्रयत्न केला, पण शक्य झाले नाही.
गंगाजलने आईचा चेहरा धुतला
"आज शुक्रवार आहे. आईच्या शरीराकडं बघवत नाहीये. गंगाजलने त्याने आपल्या आईचा चेहरा धुतला. आईच्या मृतदेहाजवळ बसून त्यानं भगवत गितेचा 18 वा अध्याय वाचला. तो पूर्ण भगवत गीता वाचू शकला नाही. त्यानंतर भगवत गीता आईच्या छातीवर ठेवली. आता आत्महत्या करण्यासाठी त्यानं पाऊल उचललं. सुरुवातीला त्याने बंदूक खरेदी करण्याचा प्रयत्न केला. मग इलेक्ट्रिक कटर खरेदी करण्यासाठी तो दोन-तीन दुकानात गेला. पण त्याला कोणीच इलेक्ट्रिक कटर दिला नाही. त्यानंतर रात्री तो घरी आला आणि आईच्या मृतदेहाशेजारी रडत बसला."
आईची मान कापली
क्षितिज लिहिले की "आज आईच्या निधनाला ७१ तास झाले आहेत. वास येऊ लागला आहे. आईची मान कटरने कापण्यात आली आहे. शुक्रवारी संध्याकाळपासून दुर्गंधी येऊ लागली. त्याने आईचा मृतदेह बाथरूममध्ये ओढून नेला. वास येऊ नये म्हणून दरवाजा बंद आहे. त्याला फक्त सुसाईड नोट पूर्ण करायची आहे. घरामध्ये दुर्गंधी पसरली आहे. आज शनिवार आहे. तो तीन दिवस रिकाम्या पोटी आहे. काही खाल्ले नाही. किचनमध्ये प्यायला गरम पाणी ठेवल्याचे त्याला आठवले."
दुर्गंधी लपवण्यासाठी लाकडी पेन्सिलचा भुसा जाळला
सुसाईड नोटमध्ये तो सर्वकाही लिहून ठेवत होता. त्याने पुढे लिहिले की खोलीतील वास थांबत नव्हता. त्यामुळे त्यांची प्रकृतीही ढासळू लागली आहे. त्याने लाकडी पेन्सिलचा भुसा जाळला आहे. उदबत्ती पेटवली जाते. घरात जायफळ ठेवले होते, तेही जाळले. सर्व डीओ देखील वापरले आहेत. तो मास्क घालून सुसाईड नोट पूर्ण करणार आहे. आज रविवार आहे. दुपारचे दोन वाजले आहेत. तीन दिवसांपासून आतापर्यंत प्रॉपर्टी डीलर तीन वेळा भाडेकरूंसह घर ला दाखवण्यासाठी आला आहे. पण आज कोणत्याही परिस्थितीत तो सुसाईड नोट पूर्ण करेल.
मृत्यूनंतर बाईक आजोबांची असेल
रविवारी तो बराच वेळ लिहीत राहिला कारण त्याला सुसाईड नोट पूर्ण करायची होती. त्यांनी पुढे लिहिले की, आज रविवार आहे. आईला सत्संगाला जायचं आहे. आईची मैत्रीण सारखी फोन करत आहे. आधी आईच्या फोन, आता माझा फोन वाजतोय. त्याने फोन उचलला. आईच्या मैत्रिणीने विचारलं मिथलेश फोन उचलत नाही, कुठे आहे? तो म्हणाला की आई मेली आहे, त्याने तिला चार दिवसांपूर्वी मारले, आता तो मरण्याच्या तयारीत आहे. हे सर्व पाहून खूप भीती वाटते. वडील गेल्यानंतर आईच्या सासऱ्यांनी वडिलांप्रमाणे तिची काळजी घेतली. त्यामुळे त्याच्या मृत्यूनंतर त्याची बाईक त्यांची असेल असं त्यानं जाहीर केलं. त्याच्या आईचे अंत्यसंस्कार त्याच्या मावशीने करावेत अशी त्याची इच्छा आहे.
वर्गातील सर्वात भित्रा, नम्र विद्यार्थी
सुसाईड नोटमध्ये क्षितीजने आपल्या कुटुंबाबद्दल लिहिलं आहे. त्याचे संगोपण चांगलं झाल्याचे त्याने सांगितले. वडिलांची सरकारी नोकरी होती. एका नामांकित शाळेत त्याने शिक्षण घेतलं. शिक्षणाकडे तो दुर्लक्ष करू लागला. तो वर्गातील सर्वात भित्रा, नम्र विद्यार्थी होता. त्याला आयुष्यात दोनच मित्र होते जे नेहमीच त्याची खिल्ली उडवत. शिक्षकांकडे अनेकदा तक्रार केली. पण कोणी ऐकले नाही. स्कूल बसमध्ये चढताना त्याच्या आत एक भीती, लाज, अस्वस्थता असे. त्याची आई त्याची आशा होती. वडील गेल्यानंतर आई आणि तो एकटा पडला. त्याचे वडील अशा वेळी सोडून गेले जेव्हा त्यांना सर्वात जास्त गरज होती.
वडील खूप धाडसी होते
आई आणि वडिलांचा संदर्भ देत क्षितिजने लिहिलं आहे की, त्याची आई त्याला अनेकदा अडवायची. तिला उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. त्याचे वडील खूप धाडसी होते. त्याची आई सांगायची की तो लहान असताना वडील त्याला हातात घेऊन दवाखान्यात गेले. तिथे माकडांना त्याला आपल्या मांडीवर घेऊन जायचे होते, पण त्याच्या वडिलांनी त्याला घट्ट पकडून त्या माकडांना हुसकावून लावले.