राहुल गांधींच्या अमेठीत काँग्रेस फेल, स्मृती इराणींची बोचरी टीका

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या मतदारसंघात काँग्रेसला मोठा झटका लागला आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Dec 1, 2017, 03:58 PM IST
राहुल गांधींच्या अमेठीत काँग्रेस फेल, स्मृती इराणींची बोचरी टीका title=

नवी दिल्ली : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या मतदारसंघात काँग्रेसला मोठा झटका लागला आहे.

अमेठीमध्ये गौरीगंज आणि जायस असे २ महापालिका आहेत. तर अमेठी आणि मुसाफीरखान या २ नगरपंचायती आहेत. एसपी उमेदवाराने गौरीगंज मतदारसंघात विजय मिळवला आहे तर जायसमध्ये भाजपच्या उमेदवाराचा विजय झाला आहे.

भाजपचा पहिल्यांदा विजय

अमेठीमध्ये भाजपच्या चंद्रमा देवी यांनी नगरपंचायतीवर विजय मिळवला आहे. याशिवाय अपक्ष उमेदवार पुरूषोत्तम दास यांनी मुसाफिरखाना नगरपंचायतीवर विजय मिळवला आहे. जायस नगरपालिकांच्या निवडणुकीत भाजप कधीच जिंकू शकला नव्हता.

राहुल गांधीवर टीका

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी म्हटलं की, 'राहुल गांधी आपल्या मतदारसंघात देखील नाही जिंकू शकले. यावरुन हे स्पष्ट होतंय की जनतेचं त्यांना समर्थन नाही आहे. जो आपल्या क्षेत्रात विजयी नाही होऊ शकत तो गुजरातमध्ये काय स्वप्न घेऊन आले आहे?'