मुंबई : सुरक्षित गुंतवणूकीसाठी पोस्ट ऑफिस किंवा बँकांमध्ये मिळणारे रिटर्न आधीसारखे आकर्षक राहिलेले नाही. FD आणि RD सारखे पॉप्युलर गुंतवणूक पर्यायांमध्ये व्याजदर कमी झाले आहेत. अशातच गुंतवणूकदार इतर पर्यायांकडे वळत आहेत. एफडी आरडी सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. परंतु गुंतवणूकदार थोडी रिस्क घेऊ इच्छित असतील तर, म्युच्युअल फंडच्या कॅटेगरीतील इंडेक्स फंड एक चांगला पर्याय ठरू शकतो. इडेक्स फंड अशा गुंतवणूकदारांसाठी चांगला आहे जे रिस्क कॅल्कुलेट करून चालू इच्छिता. यातील काही स्किम्स अशा आहेत की, ज्यांनी 5 वर्षात 14 ते 16 टक्के रिटर्न दिला आहे. म्हणजेच FD पेक्षा साधारण 3 पट!
इंडेक्स फंड काय असते ?
इंडेक्स म्युच्युअल फंडाल पॅसिव फंड असेही म्हणतात. हा फंड त्याच सेक्युरिटीजमध्ये गुंतवला जातो जे इंडेक्सला ट्रॅक करतात. इंडेक्स फंड शेअर बाजाराच्या इंडेक्स म्हणजेच NIFTY 50 किंवा SENSEX 30 मध्ये सहभागी कंपन्यांच्या स्टॉकमध्ये पैसे गुंतवले जातात. इंडेक्समध्ये कंपन्यांचे जेवेढे वेटेज असते त्याच प्रमाणात शेअर खरेदी केले जाते.
इंडेक्स फंड दीर्घ काळासाठी गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी सुरक्षित गुंतवणूक आहे. NIFTY 50 आणि SENSEX 30 या दोन्हीमध्ये हेवीवेट कंपन्यांचे शेअर असतात. यामुळे बाजाराच्या चढ उताराचा त्यावर जास्त परिणाम होत नाही. यासाठी हा स्टेबल रिटर्न देणारा सुरक्षित पर्याय आहे. त्यांचा एक्सपेंस रेशो देखील कमी असतो. रिटर्न चार्ट पाहिला तर या फंडने 5 वर्षाच्या अवधीत एफडी आरडीपेक्षा दुप्पट तिप्पट रिटर्न दिला आहे.
काही बेस्ट इंडेक्स फंड