VIDEO - विद्यार्थी शिक्षिकेसमोर म्हणतोय, 'गुलाबी आँखे जो तेरी देखू'...शिक्षिका म्हणाली...''पुढे बोल ना यार''

शिक्षिकेसमोर व्यक्त केल्या मनातील भावना 

Updated: Jan 5, 2022, 11:02 AM IST
VIDEO - विद्यार्थी शिक्षिकेसमोर म्हणतोय, 'गुलाबी आँखे जो तेरी देखू'...शिक्षिका म्हणाली...''पुढे बोल ना यार'' title=

मुंबई : सोशल मीडियावर लहान मुलांचे असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात. व्हायरल होणारे व्हिडीओ प्रत्येकालाच थक्क करतात. असाच एक जबरदस्त व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एक लहान मुलगा शिक्षिकेलाच म्हणतोय, 'गुलाबी आँखे जो तेरी देखू'

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये चार वर्षांचा विद्यार्थी मॅडमजवळ उभा राहून गाणं गात आहे. सुरूवातीला तो खूप हळू आवाजात गाणं गात आहे. पण नंतर मॅडम त्याला गाणे जोरात गाण्यास सांगतात. विद्यार्थीही‘गुलाबी आंखे जो तेरी देखी’ हे गाणे म्हणू लागतो, पण नंतर हा मुलगा मध्येच थांबते आणि ‘मॅडम माझे दात दुखत आहेत’ यावर शिक्षिका म्हणतात. तू फक्त गा....

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by memes | news | comedy (@ghantaa)

मुलगा पुन्हा आपलं गाणं गायला सुरूवात करतो. परत एकदा थांबतो,'मला पुढचं गाणं माहित नाही.' मुलासा हा निरागस अंदाज सगळ्यांनाच आवडला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हा व्हिडीओ खूप जुना असला तरीही तो तुमच्या चेहऱ्यावर हसू आणतो. लहान मुलांच्या शाळेतील गमती जमती या कायमच खास असतात. लहान मुलांच बालपण हे अतिशय निरागस असतं. या वयात फक्त त्यांना आनंद द्यायचा आणि घ्यायचा इतकंच माहित असतं. 

प्रत्येकाने आपल्या बालपणी शाळेत अशा गमती जमती केल्या आहेत. हे प्रसंग त्यांच्यासाठी पण खास असतात. बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा हा व्हिडीओ सगळ्यांनाच आवडला आहे.