सावधान...कोरोनामधून बरे होणाऱ्या काही मुलांमध्ये नवीन आजाराची लागण

'मल्टि सिस्टम इन्फ्लॅमेटरी सिंड्रोम' ची लक्षणे लहान मुलांमध्ये कोरोना संक्रमणाच्या दोन ते सहा आठवड्यांच्या आत दिसून येतात. 

Updated: May 17, 2021, 10:53 PM IST
सावधान...कोरोनामधून बरे होणाऱ्या काही मुलांमध्ये नवीन आजाराची लागण title=

मुंबई : एकीकडे, कोरोनापासून बरे झालेल्या रुग्णांमध्ये म्यूकोरमायकोसिस रोग वेगाने पसरत आहे. तर दुसरीकडे, लहान मुलांमध्ये एक नवीन रोगाचा संसर्ग दिसून येत आहे. नागपुरात या नव्या आजाराची लक्षणे 30 रुग्णांमध्ये दिसून आली आहेत. यामध्ये एका रुग्णाचा मृत्यू देखील झाला आहे. कोरोनामधून बरे झाल्यानंतर आता लहान मुलांना ‘मल्टी सिस्टम इनफ्लॅमेटरी सिंड्रोम’(Multi System Inflammatory Syndrome)नावाच्या एका नवीन आजाराची लक्षणे दिसू लागली आहेत. यामुळे लहान मुलांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विकार उद्भवत आहेत. यामध्ये मृत्यू झालेल्या रुग्णांना ब्रेन ट्यूमर झाल्याची माहिती देखील समोर आली आहे.

'मल्टि सिस्टम इन्फ्लॅमेटरी सिंड्रोम' ची लक्षणे लहान मुलांमध्ये कोरोना संक्रमणाच्या दोन ते सहा आठवड्यांच्या आत दिसून येतात. म्हणूनच, कोरोना इन्फेक्शन बरा झाल्यानंतर मुलांमध्ये काही नवीन लक्षणे दिसल्यास पालकांनी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

औरंगाबादमध्ये म्यूकोरमायकोसिसचा कहर

औरंगाबाद जिल्ह्यात सुरवातीला कोरोनाने हाहाकार माजवला होता, तर आता म्यूकोरमायकोसिसचे नवीन प्रकरणे समोर येऊ लागली आहेत. औरंगाबादमध्ये गेल्या दीड महिन्यात म्यूकोरमायकोसिसमुळे 16 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातआतापर्यंत 201 लोकांना म्यूकोरमायकोसिस झाला आहे, ज्यामध्ये 113 लोकांचे डोळे काढावे लागले आहे.

राज्यात औरंगाबादमध्ये म्यूकोरमायकोसिसचे सर्वाधिक रुग्ण सापडलेत, तर औरंगाबादमध्ये म्यूकोरमायकोसिसमुळे सर्वाधिक मृत्यू झाल्याचे ही समोर आले आहे.

तरुण मुलांसाठी कोरोनाची तिसरी लाट किती प्राणघातक?

देशात सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरु आहे. या लाटेमुळे पहिल्या लाटेपेक्षा अधिक वेगाने रुग्ण संख्येमध्ये वाढत होत आहे. ही लाट नियंत्रित होते तो पर्यंत तीन ते चार महिन्यांत कोरोनाची तिसरी लाट देखील देशात हजेरी लावेल. सर्वात कमी वयाच्या मुलांना या लाटेमुळे सर्वात जास्त धोका असल्याचे तज्ञांनी सांगितले आहे. त्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे.

18 ते 44 वर्षे वयोगटातील लोकांना कोरोना लस दिली जात आहे. परंतु आतापर्यंत देशात लहान मुलांसाठी कोणतीही लस उपलब्ध झालेली नाही. अशा परिस्थितीत लहान मुलांसाठी तिसरी लाट खूपच धोकादायक ठरु शकते.

ही लक्षणे मुलांमध्ये दिसताच, ताबडतोब डॉक्टरांना भेटा

त्यामुळे पालकांना असा सल्ला दिला जात आहे की, मुलांमध्ये असलेल्या विशिष्ट लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका आणि त्यांना ताबडतोब डॉक्टरांकडे न्या. या लक्षणांपैकी मुख्य म्हणजे ताप, सर्दी, खोकला, कोरडा खोकला, उलट्या, भूक न लागणे, अन्नाची चव कमी होणे, थकवा येणे, श्वास घेण्यास अडचण यासारखे लक्षणे आहेत. जर ही लक्षणे तुमच्या मुलांमध्ये दिसली तर, पालकांनी आपल्या मुलांना त्वरित डॉक्टरांकडे नेण्याचा तज्ञांनी दिला आहे.