जम्मू काश्मीरच्या कुपवाड्यात ६ दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू काश्मीरच्या कुपवाडामध्ये भारतीय जवानांना मोठं यश मिळालंय.

Updated: Jun 10, 2018, 05:05 PM IST

कुपवाडा : जम्मू काश्मीरच्या कुपवाडामध्ये भारतीय जवानांना मोठं यश मिळालंय. केरन सेक्टरमध्ये जवानांनी सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घातलंय.  घुसखोरीच्या प्रयत्नात असताना या दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं.  सीमेपलीकडून घुसखोरीचा या दहशतवाद्यांचा प्रयत्न सुरू होता. त्याचवेळी जवानांनी कारवाई करत त्यांना ठार केलं. सध्या या परिसरात शोध मोहीम सुरु आहे. या परिसरात आणखी काही दहशतवादी लपले असण्याची शक्यता आहे.