काश्मीर खोऱ्यात लँडलाईन सेवा कार्यरत, सोमवारी उघडणार शाळा - महाविद्यालय

शनिवारी संपूर्ण काश्मीर खोऱ्यात बीएसएनएलनं आपली लँडलाईन सेवा सुरळीतपणे सुरू केलीय

Updated: Aug 17, 2019, 06:04 PM IST
काश्मीर खोऱ्यात लँडलाईन सेवा कार्यरत, सोमवारी उघडणार शाळा - महाविद्यालय title=

नवी दिल्ली : जम्मू - काश्मीरची परिस्थिती आता हळूहळू पूर्वपदावर येतेय. शनिवारी संपूर्ण काश्मीर खोऱ्यात बीएसएनएलनं आपली लँडलाईन सेवा सुरळीतपणे सुरू केलीय. परंतु, अद्याप संपूर्ण खोऱ्यातील मोबाईल आणि इंटरनेट सेवा पूर्ववत सुरु झालेली नाही. श्रीनगरच्या सिव्हिल लाइन्स भागात घालण्यात आलेली बंदी हटवण्यात आलीय. शहरातील राजबाग, जवाहरनगर, संतनगर, हैदरपुरा, पीरबाग आणि एअरपोर्टपासून राजबागपर्यंत कोणतीही बंदी नाही. 

दरम्यान, श्रीनगरच्या डाऊनटाऊन भागात अद्यापही बंदी कायम आहे. नौहट्टा, खानयार, सफाकदल, मैसूमा, क्रॉलखुड आणि सौरा या भागांतही बंदी आहे. काश्मीर खोऱ्यात १९ ऑगस्ट म्हणजेच शनिवारपासून स्कूल कॉलेज उघडण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या भागातील परिस्थिती लक्षात घेऊन सार्वजनिक सेवाही लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.

शनिवारी काश्मीर खोऱ्यात परिस्थिती सामान्य आहे. परंतु, अजूनही मुख्य बाजार संपूर्णत: खुले झालेले नाहीत. दक्षिण काश्मीर भागात सुरक्षा व्यवस्था ध्यानात घेऊन अद्यापही बंदी आहे.