नवी दिल्ली : प्रवासासाठी कॅब बुक करण्यात आली. मात्र, कॅबमध्ये बसलेल्या दोघांनी एकाचे अपहरण केले. त्यानंतर त्याच्या मोठ्या भावाला फोन करुन पैशांची मागणी केली. तोपर्यंत रात्री १२.३० वाजण्याच्या दरम्यान त्याला लुटारुंनी त्याला बंधक केले. मात्र वहिनी आयशा फलकने मोठी चलाखी दाखवून आपल्या दीराला हिम्मत दाखवून त्यांच्या ताब्यातून सोडवले आणि त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले.
२५ मे २०१७ रोजी दरियागन येथून एक कॅब बुक करण्यात आली. मात्र, या करामधून एक जण प्रवास करत होता. थोडे अंतर गेल्यानंतर लुटारुंनी कार दुसऱ्या मार्गावर घेतली. ही बाब लक्षात येताच तरुणांने त्याला विरोध केला. मात्र, लुटारुंनी त्याच्यावर बंदूक रोखत पैशाची मागणी. त्यावेळी त्यांने आपल्याकडे पैसे नाही, असे सांगतात घरून पैसे आणून देण्याचे फर्मान सोडले. त्यानंतर त्याची वहिनी आणि मोठा भाऊ २५ हजार रुपये घेवून आलेत.
दरम्यान, पैसे घेऊन येताना पोलिसांना सांगायचे नाही. किंवा सोबत पोलीस नको असे त्यांनी धमकावले. जर असे झाले तर तुझ्या भावाला येथेच उडवून देऊन अशी धमकी दिली. त्यानुसार पैसे घेऊन मोठा भाऊ आणि त्याची वहिनी आयशा फलक भजनपुराचौक पोहोचली. यावेळी आयशा पैसे घेऊन गाडीतून खाली उतरली आणि लुटारुंनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ही बाब आयशाच्या लक्षात येताच सावधान होऊन पर्समधील पिस्तोल बाहेर काढत फायरिंग केले. त्यानंतर लुटारु पळाले आणि आपल्या दीराला बाचवले.