जवानांनी घुसखोरी उधळली, एक दहशतवादी ठार

आज पुन्हा एकदा भारतीय जवानांनी पाकिस्तानकडून होणारी घुसखोरी उधळून लावली आहे. पुंछच्या सलोतरी गावाजवळ पाकिस्तानमधून काही दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. ३ ते ४ दहशतवादी एलओसीमधून घुसखोरीचा प्रयत्न करत होते. पण जवानांनी ही घुसखोरी उधळून लावली आणि एका दहशतवादाला कंठस्नान घातलं. जवानांनी केलेल्या कारवाईत एक दहशतवादी जखमी देखील झाला.

Updated: May 28, 2017, 01:56 PM IST
जवानांनी घुसखोरी उधळली, एक दहशतवादी ठार title=

नवी दिल्ली : आज पुन्हा एकदा भारतीय जवानांनी पाकिस्तानकडून होणारी घुसखोरी उधळून लावली आहे. पुंछच्या सलोतरी गावाजवळ पाकिस्तानमधून काही दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. ३ ते ४ दहशतवादी एलओसीमधून घुसखोरीचा प्रयत्न करत होते. पण जवानांनी ही घुसखोरी उधळून लावली आणि एका दहशतवादाला कंठस्नान घातलं. जवानांनी केलेल्या कारवाईत एक दहशतवादी जखमी देखील झाला.

कृष्णाघाटी सेक्टरमध्ये एलओसीवर काही संशयित हालचाल जवानांना दिसली. त्यानंतर जवानांनी त्यावर कारवाई करत एक दहशतवाद्याला ठार केलं. काश्मीरमध्ये तणावपूर्ण वातावरण आहे. भारतीय लष्कराकडून सुव्यवस्था आणि शांतता राखण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. आज कर्फ्यू देखील लावण्यात आला. श्रीनगरमधील नौहट्टा, रेनवाडी, खानयार, एम.आर.गंज, सफा कदाल, क्रालखड आणि मैसूमा पोलीस स्थानका अंतर्गत भागात कर्फ्यू लावण्यात आला आहे.