SIP Investments vs Mercedes: SIP मुळे luxury car ची विक्री घटली?

SIP and Car Selling impact: आजकाल एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यातून आपल्या सॅलरीतून अनेक लोकं हे म्युच्यूअल फंड एसआयपीमध्ये गुंतवणूक करत आहेत. तेव्हा अशावेळी आपल्यालाही या ट्रेण्डवर लक्ष ठेवणे गरजेचे झाले आहे. 

Updated: Nov 29, 2022, 05:50 PM IST
SIP Investments vs Mercedes: SIP मुळे luxury car ची विक्री घटली?  title=

SIP and Car Selling impact: आजकाल एसआयपीमध्ये (SIP) गुंतवणूक (investment) करण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यातून आपल्या सॅलरीतून (salary) अनेक लोकं हे म्युच्यूअल फंड एसआयपीमध्ये गुंतवणूक करत आहेत. तेव्हा अशावेळी आपल्यालाही या ट्रेण्डवर (trade) लक्ष ठेवणे गरजेचे झाले आहे. परंतु तुम्हाला माहितीये का की अशावेळी कार खरेदीदारांवर या गोष्टीची परिणाम होऊ लागला आहे. सध्या सगळीकडे शेअर बाजारही (share market) चांगल्या प्रमाणात उसळी घेत आहे. अशावेळी कार खरेदीदारांमध्ये घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे अर्थात याचा परिणाम कार विक्रीवरती (buying and selling) होत आहे. या परिस्थितीमुळे खरंच कार विक्रीवरती परिणाम होतोय का यावरही तज्ञांमध्ये चर्चा होते आहे तेव्हा जाणून घेऊया नक्की याचा कसा परिणाम एसआयपीमध्यो (sip news) होता आहे आणि त्याचा तुमच्या पैशांवर परिणाम होईल की नाही. (sip and car buying financial experts comments on the luxury car demand falling)

लोक आता कार खरेदी करण्यापेक्षा जास्त सेव्हिंग्स आणि इव्हेंसमेंट्सवर (savings and Investments) भर देत आहेत. त्यामुळे लोकं फार कमी खरेदी करत असून त्यांच्या हातात फारसे पैसे नाहीत. तेव्हा आता लोकांची बचतीचा कल वाढला आहे. त्यामुळे सध्या अशा गोष्टींचा फार त्रुटक परिणाम लोकांच्या खर्चावर आणि पर्यायाने लक्झरी गोष्टींच्या खरेदी-विक्री (disposable income) आणि बचतीवर होतो आहे.  

नक्की काय आहे प्रकरण?

मर्सिडीज बेंझ इंडियाचे (Mercedes Benz) विक्री आणि विपणन प्रमुख संतोष अय्यर यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी संवाद साधताना सांगितले की, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) ही आमची सर्वात मोठी प्रतिस्पर्धी आहे. मी माझ्या टीम सदस्यांना सांगतो की तुम्ही SIP गुंतवणुकीचे चक्र मोडल्यास आम्हाला खूप फायदा होईल. संतोष अय्यर यांच्या मते पाश्चात्य देशांपेक्षा भारतात बचत करण्याकडे लोकांचा कल जास्त आहे. लोक स्वतःसाठी आणि त्यांच्या मुलांसाठी गुंतवणूक करतात आणि बचत करतात. ते म्हणाले की, लक्झरी कार खरेदीदार, संभाव्य ग्राहक जो 50,000 रुपयांच्या SIP गुंतवणुकीतून बचत करत असेल, जर ती बचत लक्झरी कार मार्केटकडे वळवली तर लक्झरी कार उद्योगाला मोठा फायदा होईल.  

हेही वाचा - Drishyam 2 Movie: दृश्यम 2 चित्रपटानं आत्तापर्यंत केली कोट्यवधींची कमाई, जाणून घ्या लेटेस्ट अपडेट्स

असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (AMFI) च्या आकडेवारीनुसार, भारतीय म्युच्युअल फंडांमध्ये सुमारे 5.93 कोटी SIP खाती आहेत. ऑक्टोबर 2022 मध्ये, SIP ने 13,000 कोटी रुपयांचा ओलांडला. शेअर बाजारातील अस्थिरता असूनही, एप्रिल-ऑक्टोबर 2022 दरम्यान सुमारे 1.42 कोटी नवीन SIP खाती उघडण्यात आली. 

तज्ञ काय म्हणतात? 

कीर्तन ए शाह, संस्थापक, क्रेडेन्स वेल्थ अॅडव्हायझर्स (सीडब्ल्यूए) यांनी ट्विट केले, "एसआयपी किती लोकप्रिय झाली आहे? मर्सिडीज बेंच हे मार्केटिंग टूल म्हणून वापरत आहे." ते लिहितात, "50 हजार मासिक SIP करणार्‍या गुंतवणूकदारासाठी 50 हजार EMI असलेली कार खरेदी करणे निरुपयोगी आहे, ज्याची किंमत पुढील पाच वर्षांत एक चतुर्थांश असेल. 

किरकोळ गुंतवणूकदारांकडून बाजाराला चालना

2020 मध्ये कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन (lockdown) आणि बाजारात मोठी घसरण असतानाही किरकोळ गुंतवणूकदारांनी स्वतःहून बाजाराला चालना दिली. किरकोळ गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडात मोठी गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. 31 मार्च 2020 पर्यंत जिथे देशात फक्त 4 कोटी डिमॅट खाती होती त्यांची संख्या 10 कोटींच्या पुढे गेली आहे. लॉकडाऊननंतर 6 कोटींहून अधिक डिमॅट खाती उघडण्यात आली आहेत.