Shradha Walkar Case : डॉक्टरसोबतचे चॅट आणि प्रिस्क्रीप्शन पाहता श्रद्धा वालकर (shraddha walkar) मृत्यूसमयी गरोदर (Shradha Walkar pregnant) होती का, असाच प्रश्न समोर आला. त्याविषयीच्या चर्चा झाल्या. कित्येकांना तर धक्काच बसला. आता या हादरवणाऱ्या प्रकरणामध्ये आणखी एक माहिती समोर आल्याचं म्हटलं जात आहे. सध्याच्या घडीला मेहरौसी पोलिसांच्या हाती तपासादरम्यान 20 हाडं लागल्याची माहिची समोर आली. दरम्यान, ती माणसाची आहेत की कोणत्या प्राण्याची यासंबंधिती अधिकृत माहिती मात्र अद्यापही समोर आलेली नाही. सध्याच्या घडीला श्रद्धाचा अतिशय निघृणपणे जीव घेणाऱ्या आरोपी आफताब पूनावाला (shraddha walker boyfriend) याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून त्याची नार्को टेस्टही करण्यात येणार आहे.
आफताबनं श्रद्धाच्या शरीराचे तुकडे करून ऑक्टोबर महिन्यामध्येच तिचं शीर आणि काही अवयवांची विल्हेवाट लावत पुरावे नष्ट केले. श्रद्धाचं शीर आणि तिचे काही अवयव त्यानं फ्रिजमध्ये ठेवत त्यातून दुर्गंधी पसरू नये यासाठी काही रसायनांचा वापर केल्याची खळबळजनक बाब तपासातून समोर आली आहे. (shraddha walkar case full story)
दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुससार आरोपीनं Google, Internet ची मदत घेत मृतदेह सुरक्षित ठेवण्यासंजर्भातील गोष्टींविषयीची माहिती शोधली होती. काही शंका असल्यास त्या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी किंवा एखाद्या मुद्द्याची सविस्तर माहिती घेण्यासाठी अनेकजण गुगलचा वापर करतात. पण, इथे मात्र आफताबनं कहरच केला. (shraddha walkar case partner searched how to keep dead body safe on google internet)
आफताबनं गळा दाबून श्रद्धाचं आयुष्य संपवत तिचा मृतदेह त्यानं बाथरुममध्ये ठेवला होता. चाकू, करवत, चॉपरचा वापर करत त्यानं तिच्या मृतदेहाचे अतिशय निर्दयीपणे तुकडे केले आणि त्यानंतर छतरपूरचं जंगल आणि मेहरौली परिसराच्या नजीकच्या भागात त्यानं मृतदेह फेकला. सध्या पोलीस यंत्रणेलाही हैराण करणाऱ्या या प्रकरणामध्ये दर दिवशी काही नवे खुलासे होताना दिसत आहेत. आता आफताबच्या नार्को टेस्टमधून नेमका कोणता उलगडा होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.