Shraddha Wakar Murder Case : दिल्लीतील (Delhi) आफताब अमीन पूनावाला (aftab poonawalla) याने आपल्या लिव्ह-इन पार्टनर श्रद्धाची निर्घृणपणे हत्या केल्याने संपूर्ण देश हादरला. त्यानंतर आता 27 वर्षीय श्रद्धाचे 35 तुकडे करणाऱ्या आफताब अमीन पूनावालाचे वास्तव समोर येत आहे. 18 दिवस आफताबने तिच्या मृतदेहाचे तुकडे ( chopping off body) फ्रीजमध्ये ठेवले आणि दिल्लीच्या वेगवेगळ्या भागात एक एक करून फेकून दिले. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून तपासातून धक्कादायक माहिती समोर आलीय. या हत्येचा आफताबला कोणताही पश्चाताप नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. (Shraddha Murder Case After cutting Shraddha into 35 pieces Aftab called another girl)
पोलिसांच्या तपासात श्रद्धाच्या हत्येनंतर कोणाला शंका येऊ नये म्हणून आफताब अगदी काहीच झाले नाही असे वागत होता.न ज्या खोलीत त्याने श्रद्धाची हत्या केली होती तिथेच तो झोपायचा. हत्येनंतर आफताब आजूबाजूच्यांची भेट घेत नव्हता. श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे ठेवण्यासाठी आफताबने फ्रिज खरेदी केला होता अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताबचे दुसऱ्या मुलीसोबत संबंध होते अशी माहिती समोर आली आहे.
श्रद्धाच्या हत्येनंतर आफताबने तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले आणि फ्रीजमध्ये ठेवले. यानंतर तो हळूहळू मृतदेहाचे तुकडे फेकत राहिला. श्रद्धाच्या हत्येनंतर काही दिवसांनी आफताबने डेटिंग अॅपद्वारे दुसऱ्या मुलीला आपल्या घरी बोलावले आणि ज्या खोलीत श्रद्धाच्या शरीराचे भाग ठेवले होते त्याच खोलीत तिच्याशी लैंगिक संबंध ठेवले. यादरम्यान आफताबने श्रद्धाचे अनेक अवयव लपवून कपाटात ठेवले होते.
हे ही वाचा : धक्कादायक ! ही वेब सीरीज पासून आफताबने आखली श्रद्धाच्या हत्येची योजना
आफताबने पोलिसांपासून वाचण्यासाठी योजना आखली होती. तसेच फॉरेन्सिक तपासणीदरम्यान रक्ताचे डाग सापडू नये म्हणून त्याने घरातील फरशी साफ करण्यासाठी सल्फर हायपोक्लोरिक अॅसिडचा वापर केला होता. खून केल्यानंतर आफताबने गुगलवर फरशी धुण्यासाठी कोणते अॅसिड वापरायचे हे सर्च केले होते. तसेच शरीराचे तुकडे करण्याची पद्धतही गुगलवर सर्च केली होती. हत्येनंतर श्रद्धा आणि त्याचे रक्ताने माखलेले कपडे एमसीडीच्या कचरा गोळा करणाऱ्या व्हॅनमध्ये टाकले.
हे ही वाचा : Murder Mystery : अनैतिक संबंधात अडसर, 'दृश्यम' स्टाईलने काढला पतीचा काटा
आफताब आणि श्रद्धा मुंबईतील एका मल्टी नॅशनल कंपनीत एकत्र काम करत होते. त्यानतंर ते दोघे रिलेशनशिपमध्ये आले. मात्र, श्रद्धाच्या कुटुंबीयांना हे नाते मान्य नव्हते. त्यामुळे दोघांनीही मुंबई सोडली. 8 मे रोजी दिल्लीत आले. पहाडगंज येथील हॉटेलमध्ये पहिल्या रात्रीचा मुक्काम केला. त्यानंतर सैदुलजाब येथील वसतिगृहात राहिले. या दोघांनी गुगलवरून सर्व ठिकाणे शोधून काढल्याने मोबाईलच्या तपासातून ही माहिती मिळाली. 18 मे रोजी लग्नाबाबत दोघांमध्ये भांडण झाले होते आणि कथितरित्या आफताबने श्रद्धाची हत्या केली. कोणाला कळू नये म्हणून त्याने मृताच्या शरीराचे अनेक तुकडे केले.