पटना : गेल्या अनेक दिवसांपासून माजी केंद्रीय मंत्री दिग्विजय सिंह यांची मुलगी श्रेयसी सिंह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या रंगत आहे. दिग्विजय सिंह यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी पुतुल सिंह यांनी खासदार पदाची जबाबदारी पार पाडली. भाजपचे सरचिटणीस अरुण सिंग आणि प्रदेशाध्यक्ष संजय जयस्वाल यांच्या उपस्थितीत श्रेयसी सिंह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. शिवाय, श्रेयसी सिंह यावेळेस निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अनेक दिवसांपासून श्रेयसी सिंह राजकारणात प्रवेश करतील अशा चर्चा रंगल्या होत्या. सुरवातीला त्या आरजेडी पक्षात प्रवेश करतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र आज त्या भाजप पक्षात प्रवेश करत आपल्या राजकारणाचा प्रवास सुरू करणार आहेत.
Shooter Shreyasi Singh (in file photo) to join BJP today. She is the daughter of former union minister late Digvijay Singh. pic.twitter.com/mrP3QIoqAC
— ANI (@ANI) October 4, 2020
श्रेयसी सिंह आंतरराष्ट्रीय नेमबाज आहेत. २०१८च्या राष्ट्रकुल स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदक जिंकले होते. त्याचप्रमाणे २०१४ मध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत दुहेरी ट्रॅप नेमबाजी स्पर्धेत त्यांनी रौप्य पदक जिंकले होते.
नेमबाजीमध्ये नशीब आजमावल्यानंतर श्रेयसी सिंह यांनी आपला मोर्चा राजकाराणाकडे वळवला आहे. आता त्या बांका किंवा जमुई या मतदार संघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा रंगत आहे.