Raju Theth: एक दोन नव्हे तर 10 वर्षाची प्लॅनिंग, लॉरेन्स गँगने असा रचला कट; घटनेचा Video समोर!

Raju Theth Shot: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या सदस्यांनी या गुंडाची त्याच्या घराजवळ गोळ्या झाडून हत्या केली होती. लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य असलेल्या रोहित गोदाराने  (Rohit Godara)  या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे.

Updated: Dec 3, 2022, 07:14 PM IST
Raju Theth: एक दोन नव्हे तर 10 वर्षाची प्लॅनिंग, लॉरेन्स गँगने असा रचला कट; घटनेचा Video समोर! title=
Raju Theth

Gangster Raju Theth Shot: राजस्थानमधील  (Rajasthan) सीकर जिल्ह्यात (Sikar) शनिवारी धक्कादायक घटना घडली. राजस्थानचा कुख्यात गुंड राजू थेठ (Raju Theth) याची शनिवारी सीकरमध्ये एका गँगने  (Lawrence Bishnoi Gang) गोळ्या झाडून हत्या केली. राजू थेठ यांची त्यांच्या घराजवळ हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या आणि त्याची हत्या केली. या घटनेनंतर राजस्थानात (Rajastan News) एकच खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. या घटनेचा व्हिडीओ (Raju Theth Shot Video) देखील समोर आला आहे.

लॉरेन्स बिश्नोई गँगच्या सदस्यांनी या गुंडाची त्याच्या घराजवळ गोळ्या झाडून हत्या केली होती. लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य असलेल्या रोहित गोदाराने  (Rohit Godara)  या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. हे त्याचे भाऊ आनंद पाल (Anand Pal) आणि बलबीर बानुदा (Balbir Banuda) यांच्या हत्येचा बदला असल्याचं त्यांनी म्हटलंय.

आणखी वाचा - गर्लफ्रेंडने ब्लॉक केले म्हणून प्रियकराने गाठलं थेट मोबाईल टॉवरचं टोक; पोलिसांनी असं उतरवलं खाली

10 वर्षांची प्लॅनिंग -

पोलिसांच्या हाती लागल्या माहितीनुसार, राजू थेठच्या हत्येचा (Gangster Raju Murder) योजना सुमारे 10 वर्षापासून आखली जात होती. राजू थेठ अनेक दिवसांपासून गँगच्या निशाण्यावर होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. रोहित गोदाराने या हत्येची जबाबदारी घेतली असून माझा बदला पुर्ण झालाय, असं त्याने उघडपणे म्हटलंय. आनंदपाल (Anadpal) पोलिसांच्या चकमकीत मारला गेला. त्यानंतर त्याची गर्लफ्रेंड आणि लेडी डॉन (Lady Don) अनुराधाने (Anuradha) लॉरेन्स बिश्नोई आणि कला जठेडी यांच्याशी हातमिळवणी केली होती.

पाहा Video -

दरम्यान, या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ (CCTV) समोर आला होता. चौघांच्या हातात शस्त्रास्त्रे दिसत आहेत. आरोपींनी गोळ्या झाडल्या आणि आवाज ऐकून लोकांची एकच गर्दी जमली. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आरोपी हवेत गोळीबार (Gun Fire) करत असल्याचं दिसतंय.