९ मजूरांचे मृतदेह विहिरीत सापडले

लॉकडाऊनमुळे कारखाना बंद झाला आणि

Updated: May 23, 2020, 10:05 AM IST
९ मजूरांचे मृतदेह विहिरीत सापडले  title=

हैदराबाद : तेलंगणाच्या वारंगल ग्रामीण जिल्ह्यात अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका गावातील विहिरीतून तब्बल ९ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. यातील ६ मृतदेह हे एकाच कुटुंबातील असल्याचं समजत आहे. इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, ही घटना वारंगलच्या गोर्रेकुंटा गावात घडली आहे. गुरूवारी संध्याकाळी चार मृतदेह सापडले तर शुक्रवारी सकाळी पाच मृतदेह काढण्यात आले. कोणत्याही मृतदेहावर जखमेचे कोणतेही निशाण नाही. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमध्ये राहणारे मकसूड आलम आणि त्यांची पत्नी निशा गेल्या २० वर्षांपासून कामाच्या निमित्ताने वारंगल येथे आले होते. उपजिविकेसाठी जूटची बग बनवण्याच काम हे दोघे करत होते. आलम, पत्नी, मुलगी, तीन वर्षांचा नातू, मुलगा सोहेल आणि शाबाद यांच्यासोबतच त्रिपुराचे शकील अहमद आणि बिहारचे श्रीराम आणि श्याम यांचे मृतदेह विहिरीतून काढण्यात आले. 

ही आत्महत्या असल्याचं पोलिसांनी नाकारलं आहे. जर ही आत्महत्या असतील तर एकाच कुटुंबातील आत्महत्या केली असती यामध्ये आणखी तीन लोकांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आलम हे सहा लोकांच्या कुटुंबासह करीमाबाद येथे भाड्याने राहत होते. मात्र लॉकडाऊननंतर त्यांनी जूट मालकाला गोदामात राहण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केली. हे संपूर्ण कुटूंब गोदामातील तळमजल्यावर राहत होते तर बिहारचं एक कुटूंब पहिल्या माळ्यावर राहत होतं. 

या घटनेची माहिती तेव्हा मिळाली जेव्हा गोदाम मालकाला या कुटुंबासह तीन लोक हरवले असल्याच कळलं. त्यांनतर शोधाशोध सुरू झाल्यावर यांचे मृतदेह विहिरीत सापडले. या तिघांनी आत्महत्या का केली? असा प्रश्न उभा राहतो. लॉकडाऊनमध्ये काम नसलं तरीही कालांतराने कारखाना सुरू करण्याचा मालकाचा विचार होता. यामुळे या आत्महत्येमागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.