Viral Letter: 'दोन दिवसांनी माझी आई मरणार आहे मला सुट्टी द्या '' शिक्षकाचा सुट्टीचा अर्ज सोशल मीडियावर व्हायरल...

सोशल मीडियावर सुट्टीचा एक अर्ज खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, हा सुट्टीचा अर्ज एका शिक्षकाचा आहे असं म्हटलं जात आहे  या अर्जात शिक्षकाने असं काही लिहिलंय कि ते वाचून प्रत्येकाच्या भुवया उंचावल्या आहेत. 

Updated: Dec 4, 2022, 01:10 PM IST
Viral Letter: 'दोन दिवसांनी माझी आई मरणार आहे मला सुट्टी द्या '' शिक्षकाचा सुट्टीचा अर्ज सोशल मीडियावर व्हायरल...  title=

viral post: सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरलं (viral) होतं असत. बऱ्याचदा काही व्हिडीओ असतात तर काही फोटो असतात,  सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल होत असतं. बरेच व्हिडीओ असे असतात जे लोकांकडून खूप पहिले जातात शेअर केले जातात. यातले बरेच व्हिडीओ हे फनी (funny video on social media) असतात तर काही प्राण्यांचे क्युट व्हिडीओ असतात तर काही व्हिडीओ घाबरवून टाकणारे असतात, (scarry horror video on social media)

सोशल मीडियावर व्हायरल होतात बरेच व्हिडीओ (viral video on social media )

मात्र लोक असे व्हिडीओ,फोटो खूप आवडीने पाहतात आणि शेअर सुद्धा करतात, जेव्हा आपण ऑफिसमध्ये असतो तेव्हा सुट्टी मिळण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात, सुट्टी हवी असेल तर वरिष्ठांना मेल करणं सह्योगीनसोबत वेळा अड्जस्ट करणं हे सगळं आलचं...

जर आपल्याला कुठे बाहेर जायचं असेल तर त्याची सूचना देणारा सुट्टीचा अर्ज आपल्याला आधीच द्यावा लागतो. तशी आगाऊ सूचना देणं बंधनकारक असत. पण काहीवेळा अचानक काहीतरी घडत आणि सुट्टी घ्यावी लागते.

बऱ्याचदा आपण  अचानक आजारी पडतो किंवा घरात कोणी आजारी पडत. कोणाचा मृत्यू होतो किंवा अचानक काही महत्वाचं काम येत. अशावेळी अचानक आपल्याला सुटीच्या टाकावी लागते. 

अजब गजब अर्ज होतोय व्हायरल 

सध्या आपण हे सगळं का बोलत आहोत तर सोशल मीडियावर सुट्टीचा एक अर्ज खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, हा सुट्टीचा अर्ज एका शिक्षकाचा आहे असं म्हटलं जात आहे  या अर्जात शिक्षकाने असं काही लिहिलंय कि ते वाचून प्रत्येकाच्या भुवया उंचावल्या आहेत. 

या शिक्षकाने दोन दिवसापूर्वीच, आई मरणार असल्याची भविष्यवाणी सांगत सुट्ट्यांसाठी अर्ज केलाय. या रजत लिहिलंय कि,  " 5 डिसेंबर सोमवार रात्री ८ वाजण्याच्या आसपास माझी आई मारणार आहे तरी तिच्या अंत्यसंस्कारासाठी ६ आणि ७ डिसेम्बरला मला सुट्टी हवीये.

त्यामुळे कृपया माझा अर्ज स्वीकार करा. 

सध्या या अर्जावर सोशल मीडियावर खूप कॉमेंट्स येतआहेत . लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. आता या अर्जातील मजकूर असा का लिहिला असावा याच कारण अद्याप समजू शकला नाहीये. पण सगळीकडे या अर्जाची खूप चर्चा आहे हे नक्की .