मुंबई : सोशल मीडियाचे जग हे एक वेगळंच जग आहे. जेथे तुम्हाला प्रत्येक गोष्टीची माहिती नेहमीच मिळत असते. येथे एकामागून एक असे व्हिडीओ समोर येतात की, तुम्ही ते पाहण्यापासून स्वत:ला रोखू शकत नाहीत आणि तासनतास मोबाईल क्रोम करत बसतो. येथे आपल्या असे व्हिडीओ पाहायला मिळताता, ज्यामुळे आपले मनोरंजन होते. तर काही व्हिडीओ हे आपल्या अंगावर काटे उभे करणार असतात. जे खरोखरचं धक्कादायक असतात.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात बांधकामाचे काम सुरू असताना डोंगराळ रस्त्यावरून जाणारा ट्रक अडकला. हा ट्रक फक्त अडकला नाही तर मोठ्या दरीत कोसळणार असतो.
रस्ता नक्की कुठे जातोय हे न पाहाता ट्रक चालकानं आपला ट्रक पुढे नेला, परंतु त्याच्या या चुकीचा परिणाम इतका मोठी असेल, असा त्याने विचार देखीस केला नसावा. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक ट्रक ड्रायव्हर गाडीला डोंगराच्या रस्त्याने कुठेतरी घेऊन जात होता. परंतु तो रस्ता फारच अरुंद होता. जेथे एका वेळी एकच वाहन जाऊ शकतं. अशावेळी रस्त्याचा जजमेंट न आल्यानं या ड्रायव्हरकडून एवढी मोठी चूक घडली.
तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता की, हा ट्रक कसा रस्त्यावर अडकून पडला आहे. या ट्रकची पुढची दोन्ही चाकं जवळ-जवळ रस्त्याखाली उतरली आहे आणि ट्रक अर्धा डोंगराच्या बाहेर लटकत आहे. तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता की, किती उंचावरती हा ट्रक हवेत लटकत आहे. तसेच या ट्रकची अवस्था अशी झाली की, ड्रायव्हरने कितीही प्रयत्न केलं तरी तो मागे काही येत नाही.
आता ट्रक ड्रायव्हरला आपल्या चुकीचा खुप जास्त पश्चाताप होत असणार हे नक्की.
हा व्हिडीओ memewalanews नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओवर लोकांच्या प्रतिक्रियाही येऊ लागल्या आहेत. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'आता काय होईल?' या कॅप्शनवरूनच ट्रक चालकाची स्थितीचा तुम्ही देखील अंदाजा लावू शकता.