रोज 'त्या' खोलीतून यायचा किंकाळण्याचा आवाज, दार ठोठावलं अन्...; सत्य समजल्यावर पोलिसही चक्रावले

Shocking Crime News: या प्रकरणामध्ये पोलिसांनी आता वैद्यकीय चाचण्यांबरोबरच इतर माध्यमांमधून तपास सुरु केला असून घडलेला प्रकार ऐकून पोलिस कर्मचारीही चक्रावून गेले आहेत.

स्वप्निल घंगाळे | Updated: Dec 18, 2023, 10:12 AM IST
रोज 'त्या' खोलीतून यायचा किंकाळण्याचा आवाज, दार ठोठावलं अन्...; सत्य समजल्यावर पोलिसही चक्रावले title=
पोलिसही चक्रावले (फाइल फोटो, सौजन्य - रॉयटर्स)

Shocking Crime News: बाप लेकीच्या नात्याला कलंक लावणारी घटना उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये घडली आहे. येथील एका व्यक्तीने स्वत:च्या मुलीवरच अनेकदा बलात्कार केल्याची धक्कादायक खुलासा समोर आला आहे. ही मुलगी गरोदर राहिल्याने एकदा तिचा गर्भपातही या नराधमाने घडवून आणला. या प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर पोलिसही चक्रावून गेले. एखादा बाप आपल्या मुलीबरोबर इतक्या निर्दयीपणे कसा वागू शकतो अशी चर्चा पोलिसांपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सर्वांकडूनच विचारला जातोय.

रोज यायच्या त्या घरातून आवाज

कनापूरमधील जूही परिसरामध्ये हा संपूर्ण प्रकार घडला. मागील अनेक दिवसांपासून लोकांना खोलीमधून मुलीच्या किंकाळण्याचा आज येत होता. घरगुती वादामुळे कदाचित घरातून तरुणीच्या आरडाओरडीचा आवाज येत असावा असं लोकांना वाटलं. मात्र दिवसभरातून अनेकदा वारंवार हे आवाज येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी एकत्र येत या घरात चाललंय तरी काय हे पाहण्याचा निर्णय घेतल्या. दरवाजा ठोठावल्यानंतर आतून एका व्यक्ती दरवाजा उघडला. घरातून रोज ओरडण्याचा, किंकाळण्याचा आवाज येतोय याबद्दल चौकशी करण्यात आली. त्यावर घरातील व्यक्तीने आधी काहीच ठाऊक नसल्याचा बनाव केला. नंतर त्याने घरामध्ये मुलं खेळत असतात तेव्हा आरडाओरडीचा आवाज येतो असं उत्तर शेजाऱ्यांना दिला.

दुसऱ्या दिवशी मुलीने दरवाजा उघडला अन्...

मात्र लोकांना या व्यक्तीच्या सांगण्यावर विश्वास बसला नाही. लोकांनी घरातील मुलं कुठे आहेत? असा प्रश्न विचारला. त्यावर या व्यक्तीने मुलांची तब्बेत ठिक नसल्याचं सांगितलं. त्यानंतर लोक तिथून निघून गेले. मात्र दुसऱ्या दिवशी ही व्यक्ती कामासाठी घराबाहेर गेल्यानंतर शेजारी पुन्हा या घराच्या दाराजवळ आले. त्यावेळेस या व्यक्तीच्या मुलीने दरवाजा उघडला. या मुलीकडे शेजाऱ्यांनी चौकशी केली असता ती अचानक मोठ-मोठ्याने रडू लगाली. या मुलीने तिच्या आईचा मृत्यू झाला आहे असं सांगितलं. मागील काही दिवसांपासून माझे वडील सातत्याने माझ्यावर बलात्कार करत असल्याचा धक्कादायक खुलासा या मुलीने केला. एकदा माझा गर्भपातही करण्यात आला आहे, असं या मुलीने सांगताच शेजाऱ्यांना धक्काच बसला.

अटक झाल्यावर आरोपी म्हणतो...

शेजाऱ्यांनी तातडीने पोलिसांना याबद्दलची माहिती दिली. पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली आहे. आरोपीने आधी आपला गुन्हा कबुल केला नाही. शेजाऱ्यांच्या दबावाखाली माझ्या मुलीने खोटी तक्रार दाखल केल्याचा या आरोपीचा दावा आहे. मात्र पोलिस आता या प्रकरणामध्ये वैद्यकीय चाचणी आणि इतर माध्यमातून तपास करत आहेत.