भाऊसुद्धा उलट्या काळजाचा, 2019 साली तिच्या आईला... श्रद्धा हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर!

श्रद्धाच्या आईने मृत्यूपूर्वी व्यक्त केलेली 'ती' इच्छा अपूर्णच, आफताबच्या निर्दयी भावामुळे सगळचं होत्याचं नव्हतं झालं!

Updated: Nov 20, 2022, 06:09 PM IST
भाऊसुद्धा उलट्या काळजाचा, 2019 साली तिच्या आईला... श्रद्धा हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर! title=

Shraddha murder case new update : श्रद्धा वालकर (Shraddha Walker) केसमध्ये (Mystery) नवनवीन खुलासे होत असल्याचं पहायला मिळतंय. श्रद्धा आणि तिचा बॉयफ्रेंड आफताब (Aftab Poonawalla) दिल्लीतील मेहरौली भागात लिव्ह इन पार्टनर म्हणून राहत होते. आफताबने श्रद्धाची गळा दाबून हत्या करत तिचे 35 तुकडे देखील केले आणि फ्रिजमध्ये स्टोअर करण्यासाठी ठेवले होते. अंगावर काटा आणणाऱ्या प्रकरणातील आरोपी आफताबच्या भावाबाबत मोठी माहिती समोर आली आहे. तोसुद्धा आफताबसारखाच निर्दयी निघाला आहे. (Shocking information in Shddar case latest marahi crime news)

आफताबच्या निर्दयी भावामुळे सगळचं होत्याचं नव्हतं झालं
श्रद्धाची आई आजारी असायची आणि त्यांना हयात असताना डोळ्यांदेखत आपल्या मुलीचा संसार थाटताना पाहायचा होता. मात्र त्यावेळी श्रद्धा स्वत: लग्नासाठी तयार नव्हती. मात्र तरीही इच्छा नसतानाही 2019 साली श्रद्धाचे वडील विकास वालकर पत्नी आणि श्रद्धाच्या बहिणीला घेऊन लग्नाबद्दलची बोलणी करण्यासाठी आफताबच्या घरी गेले होते. 

ज्यावेळी हे सर्व घरी गेले तेव्हा त्यांनी विचारही केला नाही असं त्यांच्यासोबत घडलं. आफताबप्रमाणे त्याचा भाऊसुद्धा उलट्या काळजाचा होता. वालकर कुटुंबिय आफताबच्या वसईमधील घरी गेले त्यावेळी त्याचा भाऊ असदने त्यांना घरातसुद्धा येऊ दिलं नव्हतं. मात्र काही दिवसांनंतर श्रद्धाच्या आजारी आईचं जानेवारी 2022 मध्ये निधन झालं. त्यांची शेवटची इच्छा अधुरीच राहिली. 

वीस वर्षांपासूव आफताबचं कुटुंब वसईमध्ये राहत होतं. मात्र 11 नोव्हेंबरच्या आधी म्हणजेच श्रद्धाच्या हत्येचं प्रकरण उघडकीस येण्याच्या दोन आठवड्यांपूर्वी ते वसई सोडून गेले होते. आफताबने त्याला वसईतून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करण्यास मदत केली होती. वीस वर्षे राहत असलेलं कुटुंब अचानक शिफ्ट झाल्याने त्यांना शेजारी विचारत होते. मात्र इमारतीतील रहिवाशांना त्यांचा लहान मुलगा असदला मुंबईत नोकरी लागल्याने ते मुंबईला शिफ्ट होत असल्याचं सांगितलं. आफताबचे वडील अमीन पूनावाला हे मुंबईतील कांदिवली-मालाड परिसरात चपलांचे होलसेल व्यापारी आहेत.