उंदीर मारण्यासाठी औषध टाकणं महिलेला पडलं महागात, Maggie मध्ये टोमॅटो घातला आणि...

तुम्ही देखील उंदीर मारण्यासाठी टोमॅटोला औषध लावून ठेवता का? मग सावधान 'या' महिलेसोबत जे घडलं ते तुमच्यासोबत देखील घडू शकतं

Updated: Aug 3, 2022, 09:22 PM IST
उंदीर मारण्यासाठी औषध टाकणं महिलेला पडलं महागात, Maggie मध्ये टोमॅटो घातला आणि... title=
प्रतिकात्मक फोटो

मुंबई : मुंबईतील मालाड येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जी ऐकून तुमच्या ही पायाखालची जमीन सरकेल. खरंतर आपल्यापैकी अनेक लोक उंदीर मारण्यासाठी टॉमेटोला विष लावून ठेवतात. ज्यामुळे लगेचंच त्यांचा मृत्यू होतो. असाच प्रकार एका महिलेनं देखील केला, परंतु तिचा निष्काळजीपणा तिच्या जीवावर उठला. खरं तर इथे एका महिलेने घाई गडबडीत मॅगी बनवली आणि त्यामध्ये टॉमॅटो देखील टाकला. परंतु ती असं करताना हे विसरली होती की, तिने त्याच टोमॅटोवर उंदीर मारण्याचा विष लावलं होतं.

ही मॅगी खाल्लानंतर महिलेची तब्येत बिघडली आणि तिला तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. प्रकरण उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. ही बातमी सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लोक विचारत आहेत की अशी चूक कोणी कशी करू शकते?

एका मीडिया वृत्तानुसार ही घटना मुंबईतील मालाडमध्ये घडली आहे. रेखा निषाद असे पीडित महिलेचे नाव आहे. ती मालाडमध्ये पती आणि दीरासोबत राहत होती. घरातील उंदरांमुळे महिलेला जास्तच त्रास झाला. उंदीर मारण्यासाठी तिने टोमॅटोवर विष टाकण्याचा विचार केला. त्यामुळे जेव्हा उंदीर टोमॅटो खाऊन जाईल तेव्हा त्याचा मृत्यू होईल. पण घडले उलटेच आणि टोमॅटो उंदरा ऐवजी तिने स्वतःच खाल्ला.

रुग्णालयात पोलिसांना दिलेल्या स्टेटमेंटमध्ये महिलेनं हे मान्य केलं की तिच्या स्वत:च्याच चुकीमुळे हा प्रकार घडला. खरंतर तिने टीव्ही बघत मॅगी बनवायला सुरुवात केली. यादरम्यान तिने चुकून तोच विष लावलेला टोमॅटो तिच्या मॅगीमध्ये टाकला आणि नंतर तो खाल्ला देखील.

मॅगी खाल्ल्यानंतर तिची प्रकृती खालावली आणि त्यानंतर त्यांना शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अखेर बुधवारी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.