Maharashtra Politics : दादा भूसेही निसटले, गुवाहाटीत दिसले

शिवसेना आणखी एक धक्का, एकनाथ शिंदेंच्या गळाला आणखी दोन आमदार

Updated: Jun 23, 2022, 10:48 PM IST
Maharashtra Politics : दादा भूसेही निसटले, गुवाहाटीत दिसले title=

Maharashtra Political Crisis : शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या आमदारांची संख्या वाढत चालली आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटात आणखी दोन आमदार सामील झाले आहेत. कृषी मंत्री दादा भुसे आणि माजी मंत्री संजय राठोड गुवाहाटीतल्या रॅडीसन हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे या दोघांसोबत विधान परिषदेचे आमदार रविंद्र फाटकही गुवाहाटीत दाखल झाले आहेत. शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

आतापर्यंत एकनाथ शिंदे गटाकडे एकूण 35 आमदार होते. दादा भुसे आणि संजय राठोड यात सामील झाल्यावर शिंदे गटाकडे शिवसेना आमदारांची संख्या 37 होणार आहे. त्यामुळे दोन तृतांश आमदारांची संख्या पूर्ण होणार आहे.  तसंच ७ अपक्ष आमदार असल्याने ही संख्या 44 झाली आहे. 

दादा भुसे यांच्यासह इतर आमदारांच्या आगमनानंतर रेडिसन ब्लू हॉटेलबाहेर पोलिसांचा प्रचंड फौजफाटेसह बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी काळजी घेतली जात आहे.

संजय राठोड यांच्या पत्नींना रुग्णालयात दाखल करण्यात आहे. संजय राठोड यांनी पक्ष सोडू नये अशी शितल राठोड यांची इच्छा होती. परंतु त्यांचा विरोध पत्करून त्यांनी गुवाहाटी गाठलं आहे.

तर एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन मिलिंदे नार्वेकर आणि रविंद्र फाटक हे सूरत गेले. त्यांच्यात एक तास चर्चाही झाली. पण यानंतरही एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर झाली नाही. उलट रविंद्र फाटकच गुवाहाटीत दाखल झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. 

शिवसेनेचे आणखी दोन आमदार एकनाथ शिंदे गटात सामील झाल्याने शिंदे गटाची ताकद आणखी वाढली आहे.