धक्कादायक! शिवसेना नेत्याची गोळी घालून हत्या

हत्येमागचं कारण अस्पष्ट 

Updated: Sep 2, 2020, 03:19 PM IST
धक्कादायक! शिवसेना नेत्याची गोळी घालून हत्या title=

इंदौर : मध्यप्रदेशचे शिवसेना नेते रमेश साहू यांची मंगळवारी रात्री गोळा घालून हत्या करण्यात आली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, इंदौरमधील तेजाजी शहर पोलीस ठाणे हद्दीत उमरीखेडा येथे शिवसेनेचे मध्य प्रदेशचे अध्यक्ष असलेल्या रमेश साहू यांचा ढाबा आहे. याच ठिकाणी त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला.

रमेश साहू आपल्या ढाब्यावर असताना अज्ञात व्यक्तीने गोळी घालून त्यांची हत्या केली. हत्या कुणी आणि का केली याचा अद्याप खुलासा झालेला नाही. रमेश साहू यांच्या विरोधात हत्येचे आरोप आणि जमिनीवरील वादासंदर्भात गुन्हे दाखल आहेत. 

अज्ञात आरोपींनी त्यांच्यावर गोळीबार केला. यात ते जागीच मरण पावले. तर त्यांना वाचवण्यासाठी आलेली त्यांची पत्नी व मुलगी जखमी झाली आहे. सकाळी ढाब्यावरील कर्मचारी आत गेल्यानंतर ही घटना समोर आली. ही घटना मंगळवारी मध्यरात्री दीड ते दोन वाजताच्या सुमारास घडली. साहू हे १० वर्षांपेक्षा अधिक काळ शिवसेनेचे मध्य प्रदेश प्रदेशाध्यक्ष होते.