एनडीएचा मृत्यू झालाय, शिवसेनेची आगपाखड

केंद्रीय मंत्रीमंडळ विस्ताराबाबत पत्रकार परिषद घेऊन बोलू अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिलीये.

Updated: Sep 3, 2017, 04:38 PM IST
एनडीएचा मृत्यू झालाय, शिवसेनेची आगपाखड title=

मुंबई : केंद्रीय मंत्रीमंडळ विस्ताराबाबत पत्रकार परिषद घेऊन बोलू अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिलीये. वांद्रे इथं शिवसेनेच्या आरोग्य शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते.

तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शपथविधीनंतर भाजपवर आगपाखड केली. भाजपचं सरकार आहे. ते मालक आहेत. भाजपकडे सध्या संख्याबळ आहे. मात्र हे आकडे मटक्याप्रमाणे बदलत असतात अशा शब्दांमध्ये त्यांनी भाजपवर आगपाखड केलीय. तसंच हा भाजप सरकारचा विस्तार असल्याचंही संजय राऊत म्हणाले.

एनडीए ही फक्त कागदावर आणि बैठका घेण्यापूर्तीच उरली आहे. प्रत्यक्षात एनडीएचा मृत्यू झाल्याची तिखट प्रतिक्रिया राऊत यांनी दिली.

मोदींच्या मंत्रिमंडळात कोण?

पंतप्रधान मोदींच्या नव्या मंत्रीमंडळ विस्तारात ९ नव्या मंत्र्यांचा समावेश झाला आहे. शिवप्रताप शुक्ल, अश्विनीकुमार चौबे, विरेंद्र कुमार, अनंतकुमार हेगडे, राजकुमार सिंग, हरदीपसिंग पुरी, सत्यपाल सिंग, गजेंद्रसिंह शेखावत, अल्फोन्स कन्ननथानम यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

धर्मेंद्र प्रधान, पीयूष गोयल, निर्मला सीतारमण आणि मुख्तार अब्बास नकवी यांचं प्रमोशन झालं आहे. त्यांना कॅबिनेटमध्ये समाविष्ट केलं गेलं आहे. सुरेश प्रभू यांनी रेल्वेला रामराम केला आहे. पीयूष गोयल यांच्याकडे आता रेल्वेचा भार देण्यात आला आहे. खातेवाटप जाहीर झालं आहे. पाहा कोणाला कोणतं खातं मिळालं आहे.

कोणाला मिळालं कोणतं खातं

कॅबिनेट मंत्री

1. धर्मेंद्र प्रमुख- कौशल्य विकास आणि पेट्रोलियम मंत्रालय

2. पीयुष गोयल- रेल्वे मंत्रालय

3. नर्मला सीतारमन- रक्षा मंत्रालय

4. मुख्तार अब्बास नकवी- अल्पसंख्यांक मंत्रालय

5. सुरेश प्रभू- वाणिज्य मंत्रालय

6. स्मृती इराणी- माहिती आणि प्रसारण मंत्रालय

7. नितीन गडकरी- जल संसाधन मंत्री

8. उमा भारती- पेयजल आणि स्वच्छता मंत्रालय

राज्यमंत्री

1. शिव प्रताप शुकला - अर्थ राज्यमंत्री

2. अश्विनी कुमार चौबे- आरोग्य व कुटुंब कल्याण

3. वीरेंद्र कुमार- महिला व बाल विकास

4. अनंत कुमार हेगडे- कौशल्य विकास राज्य 

5. राजकुमार सिंह- ऊर्जा आणि नूतनीकरण आणि अक्षय ऊर्जा मंत्रालय (स्वतंत्र कार्यभार)

6. हरदीप सिंह पुरी- गृहनिर्माण आणि शहरी विभाग मंत्रालय (स्वतंत्र कार्यभार)

7. गजेंद्र सिंह शेखावत- कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय

8. सत्यपाल सिंह- मानव संसाधन मंत्रालय

9. अल्फोंस कन्नननाथम - पर्यटन मंत्रालय (स्वतंत्र कार्यभार)