दिवाळीच्या आधी शशी थरूरच्या घरी आली ही 'लक्ष्मी'

कॉंग्रेस नेते शशी थरूर यांचा धाकटा मुलगा ईशान अमेरिकेत विवाहबद्ध झाला आहे.

Updated: Oct 18, 2017, 08:57 AM IST
दिवाळीच्या आधी शशी थरूरच्या घरी आली ही 'लक्ष्मी'  title=

अमेरिका : कॉंग्रेस नेते शशी थरूर यांचा धाकटा मुलगा ईशान अमेरिकेत विवाहबद्ध झाला आहे.

भूमिका दवे आणि ईशान थरूर यांच्या विवाहाची माहिती शशी थरूर यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. 

' माझ्या घरी सुनेच्या रूपात 'लक्ष्मी' आली आहे. तिला तुम्हीही आशिर्वाद द्यावेत' असे कॅप्शन देत शशी थरूर यांनी त्यांनी धनतेरसच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

  शशी थरूर यांची सून भूमिका CNN न्यूज चॅनलमध्ये काम करते तर ईशान वाशिंगटन पोस्टमध्ये काम करतो. हे दोघेही अनेक दिवस रिलेशनशीपमध्ये होते.

 २०१५ साली शशी थरूर यांचा मोठा मुलगा कनिष्क थरूरने एमांडा केल्‍ड्रन यांच्यासोबत विवाहबद्ध झाला होता. त्यांनी न्यूयॉर्कमध्ये भारतीय पद्धतीने लग्न केले होते, त्याचे फोटेही ट्विटरच्या माध्यमातून शेअर केले होते.