अयोध्या : भगवान श्रीराम आयोध्येत परत आले होते तेव्हाचं आज पुन्हा एकदा अयोध्येत जिवंत केलं जाणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ वशिष्ट मुनींच्या रूपात असतील.
सायंकाळी सरयू नदीच्या तटावर दिवाळीच्या एक दिवसआधी १.७१ लाख दिव्यांनी रोषणाई करण्यात येणार आहे.
Ayodhya: Preparations underway for #Diwali celebrations by UP government. pic.twitter.com/rar425xSRa
— ANI UP (@ANINewsUP) October 17, 2017
सरयू नदीला नेत्रजा या नावानेही ओळखले जाते. अशी मान्यता आहे की, ही नदी भगवान विष्णुच्या डोळ्यातून उगम पावली होती. त्यामुळे या नदीला नेत्रजा सुद्धा म्हणतात. सरयू नदीच्या तटावर २०१३ पासून नियमीत आरती होते.
या कार्यक्रमाला राज्यपाल राम नाईक, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक केंद्रीय आणि राज्य मंत्री उपस्थित राहणार आहेत. दुपारी एक वाजेपासून सायंकाळी चार वाजेपर्यंत भगवान रामाच्या आगमनाचं दृश्य दाखवत शोभायात्रा काढली जाईल.