मुंबई : शार्क टँक इंडिया (Shark Tank India) हा शो भारतात मोठ्या प्रमाणात पाहिला जातो. सोशल मीडियावर देखील तो चर्चेत असतो. त्याचे अनेक एपिसोड सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. शार्क टँक इंडियामध्ये दिसणारे जजेस खूप कमी वयात मोठे उद्योगपती झाले आहेत. उद्योग क्षेत्रात त्यांचा अनुभव दांडगा आहे, म्हणूनच ते या शोचे जज आहेत. पण तुम्हाला माहित आहे का या जजेसकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. चला जाणून घेऊया त्यांच्या कलेक्शनमध्ये कोणत्या महागड्या गाड्या आहेत. (Shark tank india judges expensive car collection)
Ashneer Grover : शार्क टँक इंडिया या शोमध्ये सडेतोडपणे बोलणारा जज म्हणजे अशनीर ग्रोवर. त्यामुळेच तो सर्वात लोकप्रिय देखील आहे. Bharat Pe चा सह-संस्थापक अशनीरकडे अनेक शानदार कार आहेत. ज्याची किंमत करोडोंमध्ये आहे. अशनीर ग्रोवरकडे 2.5 कोटींची Mercedes Maybach, 1.2 कोटींची Porsche Cayman, 77 लाखांची Mercedes Benz GLS 350 आणि 54 लाख रुपयांची Audi A6 आहे.
Peyush Bansal : लेंसकार्टचा सह-संस्थापक आणि सीईओ पीयूष बंसल याची संपत्ती जवळपास 600 कोटी रुपयांची आहे. त्याच्याकडे बीएमडब्ल्यू 7 सीरीजची कार आहे. ज्याची किंमत 1.70 कोटी रुपये आहे.
Aman Gupta : अमन गुप्ता बोट कंपनीचा संस्थापक आहे. त्याची संपत्ती जवळपास 10,500 कोटींची आहे. अमन गुप्ता कडे 55 लाखांची BMW X1, BMW 7 आहे. ज्याची किंमत दीड ते अडीच कोटींपर्यंत आहे.
Namita Thapar : बिजनेस व्युमन नमिता थापर भारतातील उद्योगपतींमध्ये एक मोठं नाव आहे. मल्टीनॅशनल कंपनी चालवणारी नमिता खूपच स्टायलिश आहे. तिच्याकडे 1.15 कोटींची BMW X7 कार आहे.
Anupam Mittal : अनुपम मित्तल याने shaadi.com ची सुरुवात केली होती. अनुपम मित्तल देखील खूप स्टायलिश आयुष्य जगतो. अनुपम मुंबईच्या सर्वात महागड्या ठिकाणी राहतो. त्याच्याकडे 3.6 कोटींची lamborghini huracan आहे.
Vineeta Singh : विनीता सिंह देखील मुंबईची राहणारी आहे. तिच्याकडे mercedes benz gl class कार आहे. ज्याची किंमत 79.78 लाख रुपये आहे.
Ghazal Alagh : गजल अलघकडे देखील सेडान Audi A8 आहे. ज्याची किंमत 1.86 कोटी आहे. गजल अलघ ही मामाअर्थ की सीईओ आहे.