मुंबई : कर्नाटक निवडणूकीत भाजपला चांगल्या जागा मिळाल्या नसूनही बहुमत मिळवू शिकलेली नाही. अशा परिस्थितीत भाजपच्या हातातील बाजी पलटताना दिसत आहे. अशा वेळी शेअर बाजार देखील थोडं घाबरलेलं आहे. सेंसेक्स 450 अंकानी तुटलं आहे. तर निफ्टी जवळ पास 120 प्वाईंटने कमी झालेलं आहे. दोन्ही इंडेक्स लाल रेषेच्या जवळपास फिरत आहे. आता बाजार बंद होत असताना 11 अंकानी खाली आलं असून 35535 वर पोहोचले आहे तर निफ्टी 12 अंकानी खाली आली असून 10800 यावर स्थिरावली आहे.
काही वेळापूर्वी कर्नाटकमध्ये भाजपने बहुमताचा जादूई आकडा गाठला होता. मात्र हळू हळू हे चिन्ह पालटताना दिसलं. तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस आणि जेडीएस एकत्र येऊन सरकार स्थापनेची तयारी करत आहे. या सगळ्याचा परिणाम शेअर बाजारावर झाला आहे. ज्या ठिकाणी शेअर बाजार वरून 450 प्वाईंट वरून खाली येण्याच्या परिस्थितीत दिसत आहे. तर निफ्टी 120 अंकावरून खाली येत 10800 खाली आलं आहे.
कर्नाटक निवडणुकीचा निकाल पाहता शेअर बाजाराने चांगली मुसंडी मारली होती. एका वेळी सेंसेक्स 434 अंकावर स्थिरावला होता आणि 35990 एवढा आकडा गाठला होता. निफ्टी 119 अंकानी मंजबूत असून 10926 पर्यंत पोहोचली होती. मात्र जशी बाजी पलटली तसा शेअर बाजाराला मोठा फटका बसला. मिडकॅप शेअर्सवर दबाव आल्या कारणाने बाजार कोसळला.
दिवसाच्या सुरूवातीला मिडकॅप आणि स्मॉलकॅफमध्ये चांगली उसळी मारताना दिसली. मात्र जस जसा दिवस पुढे सरकला मिडकॅप इंडेक्स 1.25 टक्क्यांनी खाली आलं. मिडकॅपमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाल्यामुळे सर्वात मोठा फटका बसला. मिडकॅप घसरून 16131 या स्तरावर पोहोचला आहे. तर स्मॉलकॅप इंडेक्समध्ये 0.13 टक्के वाढ झाली असून 17633 स्तरावर पोहोचले आहे.