Share Market Update: भारतीय शेअर मार्केटमध्ये सध्या जोरदार वाढ दिसून येते आहे. आज शुक्रवारी म्हणेजच आठवड्याच्या शेवटच्या खरेदी-विक्रीमध्ये शेअर बाजार हिरव्या सिग्नलवर ओपन झाले आणि त्याच चिन्हावर तो क्लोझही झाला. या तेजीमुळे आज सेन्सेक्स आणि निफ्टीची स्थिती काय आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
शेअर बाजारात आज शेअर 57,500 या आकड्यांवरून पार झाला. त्यामुळे आज बऱ्याचश्या शेअरनी चांगले रिटर्न्स दिले आहेत. आजचा व्यवहार पाहिला तर शेअर बाजारचा सेन्सेक्स 712.46 या आकाड्यावर होता आणि तो 1.25% या वाढीसह 57,570.25 या आकड्यावर क्लोझ झाला आहे तर निफ्टी 228.65 आकाड्यांनी म्हणजेच 1.35% इतका घसरून 17,158.25 या आकड्यांवर क्लोझ झाला आहे.
28 जुलै रोजी एलआयसीच्या शेअरमध्ये पुन्हा वाढ झाली आहे. आज LIC चे शेअर्स 2.65 इतके म्हणजेच 0.39% च्या घसरणीसह 677.55 वर घौडदोड करतो आहे.
जागतिक शेअर मार्केटमध्ये सध्या तेजी आहे आणि जागतिक बाजारात रूपयाही मजबूत स्थितीमध्ये आहे. सकाळी म्हणजे मार्केट ओपन होण्याच्या स्थितीत सुरूवातीला 30 चा सेन्सेक्स हा 462.23 वरून 57,320.02 वर ओपन झाला तर 50 चा निफ्टी हा 17,079.50 या आकड्यावर ओपन झाला. त्यामुळे सकाळपासून शेअर मार्केटमध्ये चांगलीच तेजी आहे.
जागतिक बाजार स्थिती काय आहे, जाणून घ्या
यूएस फेडने व्याजदरात वाढ केल्यावर सलग दुसऱ्या दिवशी जागतिक बाजारपेठेत चांगली वाढ दिसली आहे. डाऊ जोन्स 330 अशा आकड्यांनी उसळी घेत त्याने मोठा उच्चांक गाठला आणि उच्चांकावर थांबला. त्याच वेळी Nasdaq आणि S&P 500 चा निर्देशांक 1 टक्क्यांनी वाढला SGX निफ्टी 17100 च्यावर घौडदौड करतो आहे. जपानचा निक्की 0.27 टक्क्यांनी वाढला.